UP Marriege News SAAM TV
देश विदेश

Marriage News: एका रात्रीत मोडला नवरदेवाचा संसार! दुसऱ्या दिवशी नवरीने दिराशी केलं लग्न

Marriage Broke In One Night: नवरदेवाच्या आयुष्याची 'खिचडी' झाली; पंतप्रधानांचं नाव सांगता आलं नाही म्हणून लग्न मोडलं, धाकट्याच्या गळ्यात वरमाला!

Chandrakant Jagtap

UP Marriege News: नवरदेवाला देशाच्या पंतप्रधानांचं नाव माहीत नाही म्हणून मोव्हण्यांनी त्याच्या छोट्या भावाशी बहिणीचं लग्न लावल्याचा अजब प्रकार उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे मोठ्या भावाशी लग्न लागल्यानंतर त्याच्या छोट्या भावाशी पुन्हा नवरीचं लग्न लावलण्यात आलं. सैदपूर पोलीस स्टेशन परिसरात शनिवारी हे प्रकरण समोर आलं.

मीडिया रिपोर्टनुसार, लग्न झाल्यानंतर सकाळी खिचडी समारंभात वधूला मेहुण्यांनी अनेक प्रश्न विचारले. यात एका प्रश्नात देशाच्या पंतप्रधानांचे नाव विचारले. पण वराला पंतप्रधानांचे नाव सांगता आले नाही. यानतंर मेहुण्यांनी आणि वधूच्या नातेवाईकांनी नवरदेव मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचं म्हटले आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या वराच्या धाकट्या भावासोबत वधूचे लग्न लावून दिले. या प्रकरणाची सध्या परिसरात जोरदार चर्चा आहे.

वधू-वर ६ महिन्यांपासून फोनवर बोलते होते

सैदपूर पोलीस स्टेशन हद्दीतील नसीरपूर गावात राहणाऱ्या शिव शंकरचा विवाह कारंडा पोलीस स्टेशन हद्दीतील बसंत पट्टी येथील रहिवासी रंजनासोबत ठरला होता. दोन्ही बाजूच्या लोकांनी 11 जून रोजी दोघांचा विवाह निश्चित केला. विशेष म्हणजे 6 महिन्यांपूर्वी मुलीच्या बाजूच्या लोकांनी नवरदेवाला टिळा लावून लग्न निश्चित केले होते. तेव्हापासून ते दोघे एकमेकांशी मोबाईलवरून बोलत होते. दरम्यान 11 जून रोजी वाजत गाजत नवरदेवाची वरात नवरीच्या घरी दाखल झाली. रात्री संपूर्ण विधीनुसार विवाह सोहळा पार पडला.

नवरदेवाला पंतप्रधानांचं नाव माहित नव्हतं

सकाळी खिचडी समारंभ आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान नवरदेवासोबत त्याचे मेहुणे आणि मेहुण्या थट्टा मस्करी करत होते. तेव्हा एक मेहुणीने त्याला देशाच्या पंतप्रधानांचे नाव विचारले. पण शिवशंकर देशाच्या पंतप्रधानांचे नाव सांगू शकला नाहीत. (Crime News)

शस्त्राच्या जोरावर मुलीचं छोट्या भावाशी लग्न

यानंतर मुलीच्या नातेवाइकांनी मुलगा हाफ माइंड असल्याचे म्हटले. तसेच त्याला आपली मुलगी न देण्याचा निर्णय गेतला. वराच्या वडिलांनी आरोप केला आहे की, लग्नाच्या वरातीत गेलेला माझ्या धाकट्या मुलगा अनंत याच्याशी मुलीच्या बाजूच्या लोकांनी शस्त्राच्या जोरावर मुलीचे लग्न लावून दिले. तसेच माझा धाकटा मुलगा अनंत याचे वय अजून कमी आहे असे देखील त्यांनी सांगितले आहे.(Breaking News)

दुसऱ्या दिवशी नवरीला घेऊन गेले

हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. वराच्या वडिलांनी सांगितले की, एवढं होऊनही आम्ही घाबरून लग्न स्वीकारले आणि आमच्या सुनेसह घरी आलो. परंतु शनिवारी अचानक मुलीच्या बाजूचे लोक माझ्या घरी आले आणि सुनेला निरोप देण्यासाठी दबाव टाकू लागले. मी नकार दिल्याने त्याने माझ्या सुनेला बळजबरीने ओढण्यास सुरुवात केली. त्यानंतर मी पोलीस हेल्पलाइन क्रमांक 112 वर फोन करून या प्रकरणाची माहिती दिली. सध्या दोन्ही पक्षांना सैदपूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून पोलीस या प्रकरणात मध्यस्थी करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT