Girl Marriage Age 
देश विदेश

Girl Marriage Age: मुलींच्या लग्नाचं वय कमी होणार, लग्नाचं वय 9 वर्ष करण्यासाठी कायदा

Girl Marriage Age: मुलीच्या लग्नाचं वय हे कमी करण्यात येणार आहे. यासंदर्भात कायदा तयार केला जाणार असून त्याचं विधेयक संसदेत मांडण्यात आले आहे.

Vinod Patil

मुलीच्या लग्नाचं वय आता 9 वर्ष करण्यात येणार आहे. तसं संसदेत विधेयकही मांडण्यात आलंय. त्यामुळे लवकरच हा कायदा होणार असून मुलींच्या लग्नाचं वय 18 वरून थेट 9 वर येणार आहे. नेमकं हे कुठं झालंय आणि का करण्यात आलंय त्याचा हा विशेष रिपोर्ट.

सध्या भारतात मुलींचं लग्नासाठी वय 18 वर्षे बंधनकारक आहे, आता हेच वय 21 वर्ष करण्यासाठी भारतात हालचाली सुरू आहेत. भारतापासून अवघे दोन देश दूर असलेल्या इराकमध्येही मुलीच्या लग्नाचं वय 18 वर्षं एवढंच आहे. मात्र आता इराकमध्ये मुलींच्या लग्नाच्या वयाबाबत धक्कादायक कायदा करण्यात येणार आहे. आता हेच वय 18 वर्षांवरून 9 वर्षांवर आणण्याच्या तयारीत इराक सरकार आहे, यासंदर्भातलं विधेयकही इराकच्या संसदेत मांडण्यात आलंय. या विधेयकामुळे जगभरात मोठी चिंता व्यक्त होऊ लागलीय, अनेक देश आणि विचारवंतांकडून या विधेयकाला विरोध होऊ लागलाय. कारण या निर्णयामुळे

लग्नाचं वय कमी केल्यानं काय होणार?

तरूण मुलींच्या शिक्षणावर निर्बंध

मुलींच्या आरोग्यावर परिणाम होणार

बालविवाहांमुळे मुलींना शाळा सोडावी लागणार

अकाली गर्भधारणा आणि घरगुती हिंसाचार वाढण्याची भीती

इराकच्या या निर्णयामुळे मानवाधिकार संघटनांनी मोठी चिंता व्यक्त केलीय, मात्र भारताशेजारील इतर मुस्लिम बहुल देशात मुलींच्या लग्नाचं वय काय आहे ते पाहूयात.

कोणत्या देशात लग्नाचं किती वय?

भारतात 18 वर्ष

बांग्लादेश 18 वर्ष

पाकिस्तान 16 वर्ष

अफगाणिस्तान 16 वर्ष

इराण 13 वर्ष

युनिसेफच्या अहवालानुसार इराकमध्ये 28 टक्के मुलींची लग्ने 18 वर्षांच्या आधी होतात, आता याला कायद्याची जोड मिळाली तर हे प्रमाण भयानक वाढणार. याचा दूरगामी परिणाम इराकच्या महिलांवर होणार आहे. सारं जग प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करत असताना इराकचा प्रवास मात्र आदिम काळाकडे सुरू झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Politics : महाठग, NDAची हवा, ५ किंगमेकर नेते; महाराष्ट्राचे CM फडणवीस बिहारमध्ये प्रचाराला, सांगितलं बेरजेचं राजकारण

Pune Police File Case Against Nilesh Ghaywal: इथे फक्त बॉस, बाकी सगळे....गुन्हेगारीच्या रील्स अपलोड केल्याप्रकरणी निलेश घायवळ वर गुन्हा|VIDEO

Dog Attack : शाळेत जाणाऱ्या चिमुकलीचे कुत्र्याने तोडले लचके; विद्यार्थिनी गंभीर जखमी

Maharashtra Live News Update: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आज एकत्र दिसणार

महिलेनं धावत्या लोकलवर फेकला दगड, VIDEO व्हायरल, मुंबई पोलिसांची एन्ट्री झाली अन् सत्य आलं समोर

SCROLL FOR NEXT