mark zuckerberg Saam Tv
देश विदेश

Mark Zuckerberg: मार्क झुकरबर्ग पुढच्या वर्षी फेसबूकमधून बाहेर पडणार? कंपनीने दिलं उत्तर

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मेटाचे संस्थापक मार्क झुकरबर्ग पदाचा राजीनामा देणार असल्याचं वृत्त कालपासून माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत होतं. मार्क झुकरबर्ग पुढील वर्षी आपल्या पदाचा राजीनामा देतील, असा दावा केला जात होता. मात्र मेटाने या वृत्ताचे खंडन केलं आहे. फेसबूक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या मेटा या कंपनीचे मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) सीईओ आहे. झुकेरबर्गच्या राजीनाम्याची चर्चा चुकीची असल्याचे मेटाच्या प्रवक्त्याने ट्वीटमध्ये सांगितले आहे.

2023 मध्ये मार्क झुकरबर्ग आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती 'द लीक्स'ने दिली होती. अहवालात अज्ञात स्त्रोतांचा हवाला देण्यात आला आहे. अलीकडेच कंपनीने 11,000 कर्मचार्‍यांची कपात करण्यात आली आहे. कंपनीने खर्च वाढल्याचे कारण देत कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची चर्चा आहे.

मेटाने नोकरीवरुन कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना चार महिन्यांचा अतिरिक्त पगार दिला जाईल. ट्विटरने मेटापूर्वी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. ट्विटरचा ताबा मिळताच इलॉन मस्कने सीईओ पराग अग्रवाल, मुख्य वित्त अधिकारी नेड सेगल आणि पॉलिसी हेड विजया गड्डे यांच्यासह अनेकांना काढून टाकले. तर अॅमेझॉन आणि गुगलबद्दलही अशाच प्रकारची माहिती समोर येत आहेत. लवकरच या दोन कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणात लोकांना कामावरून काढले जाऊ शकते, असे मानले जात आहे.

18 वर्षांत प्रथमच कंपनीला नोकर कपात करावी लागली

फेसबुकची सुरुवात 2004 साली झाली, जी आता मेटा झाली आहे. 18 वर्षात कंपनीला पहिल्यांदाच अशा परिस्थितीचा सामना करावा लागला आहे की हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, मेटामध्ये काम करणाऱ्यांची संख्या जवळपास 87 हजार आहे. मेटाच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण होत असून कंपनीच्या मार्केट कॅपवर त्याचा वाईट परिणाम झाला आहे. मेटाचा स्टॉक या वर्षी 73 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, मार्क झुकेरबर्गच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर मेटाच्या शेअरची किंमत वाढली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT