Marburg Virus Saam TV
देश विदेश

Marburg Virus: कोरोनापेक्षाही घातक 'मेरबर्ग'ने जगाची चिंता वाढवली; WHOने बोलावली तातडीची बैठक

मेरबर्ग व्हायरसच्या प्रादुर्भावावर चर्चा करण्यासाठी WHO ने नुकतीच एक बैठक बोलावली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Marburg Virus Outbreak : कोरोना संकटातून जग आता कुठे सावरत आहे. कोरोना व्हायरसचा धोका कमी झाला असताना, आता नवं संकट जगासमोर उभं ठाकलं आहे. मारबर्ग व्हायरसने आता जगाचे चिंता वाढवली आहे.

मारबर्ग व्हायरस मध्य आफ्रिकन देशांमध्ये वेगाने पसरत आहे. हा व्हायरस कोरोना आणि इबोलापेक्षाही अधिक धोकादायक आणि प्राणघातक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या व्हायरसच्या प्रादुर्भावावर चर्चा करण्यासाठी WHO ने नुकतीच एक बैठक बोलावली आहे.

मारबर्ग व्हायरसने आफ्रिकन देश इक्वेटोरियल गिनीमध्ये कहर केला आहे. या व्हायरसच्या संसर्गामुळे आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या संख्येने लोक यामुळे बाधित होत आहेत. मारबर्ग व्हायरस संसर्गाची लक्षणे इबोला व्हायरससारखीच आहेत. (Latest News Update)

या व्हायरसच्या संसर्गामुळे रुग्णाला ताप येतो, छातीत दुखते. जेव्हा परिस्थिती बिघडते तेव्हा रुग्णाचा मृत्यू देखील होतो. WHOने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, मारबर्ग व्हायरसचा इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेला हा पहिला संसर्ग आहे. बाधित भागात वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत, जी संक्रमित व्हायरस बाधितांची ओळख करून त्यांना आयसोलेट करत आहेत आणि त्यांच्यावर उपचार करत आहेत.

मारबर्ग व्हायरस किती धोकादायक ठरू शकतो याचा अंदाज यावरून लावता येतो की WHO याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बैठका घेत याला नियंत्रित करण्यासाठी पावलं उचलत आहे.

मारबर्ग व्हायरसची लक्षणे

या व्हायरलची लक्षणे दिसण्यासाठी दोन ते 21 दिवसांचा कालावधी लागतो. ज्यामुळे अचानक ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, उलट्या आणि अतिसार ही लक्षणे दिसतात. ही लक्षणे टायफॉइड आणि मलेरिया सारखीच असतात, म्हणूनच लोक याला हलक्यात घेतात आणि सुरुवातीचे उपचार करत नाहीत. पण नंतर हा व्हायरस वाढते आणि रुग्णाची त्यातून सुटका होणे जवळपास कठीण होऊन जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT