Maoist Saam TV
देश विदेश

Maoist: माओवाद्यांना पकडण्यासाठी ‘स्पायवेअर’ची मदत- माओवादी तेलंगण कमिटीचा आरोप

Maoist: माओवाद्यांना मदत करणाऱ्या लोकांना गुप्तचरांकडून आमिष दाखविले जात असून माओवाद्यांवर विषप्रयोग केला जात असल्याचा आरोप कमिटीने केला आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपुर: छत्तीसगड, तेलंगणच्या सीमाभागात सक्रिय असलेल्या माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांकडून गुप्तरित्या कारवाई केली जात असल्याचा आरोप माओवादी तेलंगण कमिटीने केलाय. (Maoist Telangana State Committee) मोबाईल फोनमध्ये स्पायवेअर (Spyware) जोडून माओवाद्यांचा (Maoist) शोध घेतला जात असल्याचे कमिटीने निवेदनात म्हटले आहे. पोलिसांनी आता मोठी योजना आखली असून माओवाद्यांचे मोठ्या संख्येने एन्काउंटर (Encounter) होण्याची शक्यताही वर्तविली तेलंगण कमिटीने वर्तविली आहे. माओवाद्यांना मदत करणाऱ्या लोकांना गुप्तचरांकडून आमिष दाखविले जात असून माओवाद्यांवर विषप्रयोग केला जात असल्याचा आरोप कमिटीने केला आहे. (Maoist Telangana Committee Accuses police are using Spyware to arrest Maoists)

हे देखील पहा -

माओवादी संघटना तेलंगण कमिटीकडून दर सहा महिन्यांनी निवेदन जारी केले जाते. यानुसार काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केलेल्या निवेदनात माओवाद्यांनी पोलिस यंत्रणांवर खळबळजनक आरोप केले आहेत. त्यात म्हटले, की पोलिसांनी हॅकर्सच्या (Hackers) मदतीने माओवाद्यांच्या फोनमध्ये ॲप्स (स्पायवेअर) इन्स्टॉल केले आहेत. या आधारावर माओवाद्यांच्या हालचाली टिपल्या जात आहेत. घटनास्थळाचे फोटो आणि व्हिडिओ तयार झाल्यानंतर संबंधित घटनास्थळी कोंम्बिग ऑपरेशन राबविले जात आहे. तेथे मोठ्या प्रमाणात एन्काउंटरही केले जात असल्याचा दावा माओवादी कमिटीने केला.

तेलंगण कमिटीला गुप्तपणे सहकार्य करणाऱ्या लोकांची धरपकड केली जात असून त्यांना धमक्या देत, मानसिक आणि शारीरिक छळ करत त्यांना समितीविरोधात काम करण्यास भाग पाडले जात आहे. कमिटीच्या सहकाऱ्यांकडून आणण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांत विष टाकण्यात येत आहे. त्यामुळे माओवाद्यांचा बळी जात असून काही जण दीर्घकाळ आजारी पडत आहेत. गेल्या काही महिन्यांत वाजेडू वेंकटापुरम दलमच्या माओवाद्यांवर पोलिसांनी अशाच प्रकारे विषप्रयोग केल्याने दलमचे अनेक नेते आजारी पडले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT