Manoj Jarange Patil on OBC Community Saam Tv
देश विदेश

Manoj Jarange Video: 'मराठा-ओबीसींमधील सलोखा बिघडू देऊ नका', मनोज जरांगे पाटील यांचं आवाहन

Maratha And OBC Aarakshan: मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते अंतरवाली सराटी येथे दाखल झाले असता त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे.

डॉ. माधव सावरगावे

'मराठा-ओबीसींमधील सलोखा बिघडू देऊ नका', असं आवाहन मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते अंतरवाली सराटी येथे दाखल झाले. यावेळी जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आलं आहे. यातच समाज बांधवाना संबोधिता संबोधित करताना त्यांनी हे आवाहन केलं आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, ''गावातील ओबीसी लोकांनी कितीही विरोध केला तरीही आपण त्यांना दुखवायचे नाही. गाव खेड्यातली आपली घडी विस्कटू द्यायची नाही. ते (छगन भुजबळ) भांडण लावतात. आपण आपल्या शिवभाऊला आपले समजायचे. राज्यभरातील ओबीसी आणि मराठा एक आहे.''

जरांगे म्हणाले, ''छगन भुजबळ यांना दंगली घडवायच्या आहेत. मात्र त्यांचे स्वप्न आपल्याला पूर्ण होऊ द्यायचे नाही. भोगायची वेळ आली तर गोरगरीब मराठा ओबीसींना भोगावे लागणार आहे. भजबल यांना काही होणार नाही.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: नवी मुंबईत भाजपला मोठं खिंडार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

Kishore Kadam : किशोर कदम यांचे गाजलेले सिनेमे आणि अविस्मरणीय भूमिका

गावाहून परतली अन् वसतीगृहात गळ्याला दोर लावला; आयुष्य संपवण्यापूर्वी वडिलांना फोन, कोल्हापूर हादरलं

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वधर्मीय धार्मिक स्थळावरील सर्व भोंगे उतरवले

Buldhana MLA Sanjay Gaikwad : उबाठाच्या बापात दम नाही, एकनाथ शिंदेंच्या आमदाराची आधी जीभ घसरली, मग म्हणाले...

SCROLL FOR NEXT