Manish Sisodia Saam Tv
देश विदेश

Manish Sisodia CBI Remand: मनिष सिसोदिया यांना ४ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी

राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने मनीष सिसोदिया यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

Shivaji Kale

नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या नवीन अबकारी धोरणात झालेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना सीबीआयने सोमवारी दुपारी राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात हजर केले.

सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांच्या कोठडीबाबत निर्णय दिला आहे. राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने मनीष सिसोदिया यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.  (Political News)

मनीष सिसोदिया ४ मार्चपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार आहेत. सिसोदिया यांना न्यायालयात हजर केल्यानंतर सीबीआयने पाच दिवसांची कोठडी मागितली होती, ती न्यायालयाने मान्य केली.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना सीबीआयने कथित दारू घोटाळ्यात काल ८ तासांच्या चौकशीनंतर अटक केली होती.सीबीआयने न्यायालयात युक्तीवाद करताना सिसोदिया योग्य उत्तर देत नसल्याचं म्हटलं. यावर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.

दिल्ली सरकारच्या नवीन अबकारी धोरणात कथितपणे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आप सरकारवर सातत्याने केला जात आहे. यामध्ये व्यापाऱ्यांना फायदा होईल असं अबकारी धोरण तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. तसंच एका अधिकाऱ्याने देखील या सर्व प्रकरणात आयएएस अधिकाऱ्याचं नाव घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT