Manish Sisodia Judicial Custody sakshi News
देश विदेश

Delhi Liquor Policy: 'आप' च्या अडचणी काही सुटेनात! मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत २६ एप्रिलपर्यंत वाढ

Delhi Liquor Policy: दिल्ली दारू धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणी वाढू शकतात. न्यायालयाने सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केलीय.

Bharat Jadhav

Manish Sisodia Judicial Custody: दिल्लीच्या दारू धोरणाप्रकणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदिया यांना पुन्हा एक झटका बसलाय. राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत २६ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आलीय.

दरम्यान राऊस ॲव्हेन्यू कोर्ट या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ एप्रिल रोजी ११ वाजता करणार आहे. ज्या कागदपत्रांची तपासणी झाली नाहीये, त्या कागदपत्रांची यादी जमा करावी, असे निर्देश कोर्टाने आजच्या सुनावणीदरम्यान दिलेत. न्यायालयाने यापूर्वी आम आदमी पक्षाचे (आप) नेते सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १८ एप्रिलपर्यंत वाढ केली होती.

सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना त्यांचे वकील मोहित माथुर यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. या प्रकरणाची चौकशी करण्यात जाणून बुजून उशीर केला जात आहे. याच प्रकरणातील अजून एक आरोपी बेनॉय बाबू याच्या जामीन याचिकेचा हवाला देताना वकील माथुर म्हणालेत की, सिसोदिया हे आता कोणत्या मोठ्या पदावर नाहीत. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सिसोदिया यांच्या भूमिकेची ईडी आणि सीबीआय दोन्ही चौकशी करत आहेत.

दिल्ली दारू धोरण तयार करण्यात आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचार झाल्याचा दावा ईडीने केलाय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे त्याचे मुख्य सूत्रधार आहेत. केजरीवाल यांच्यासह 'आप'चे अनेक नेते आणि मंत्रीही या संपूर्ण प्रकरणात अडकलेत.

दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयाने आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २३ एप्रिलपर्यंत वाढ केली. केजरीवाल यांना केंद्रीय तपास यंत्रणेने २१ मार्च रोजी अटक केली होती. दुसरीकडे ईडीच्या आरोपावर टीका करताना 'आप' ने म्हटलं की, बदल घेण्याच्या हेतूनेच ही कारवाई करण्यात येत आहे, जनता याचं उत्तर देतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: वेड्यासारखं प्रेम... रुग्ण तरुणीचा मृत्यू; पुरलेला मृतदेह घरी आणून ७ वर्षे सोबत राहिला डॉक्टर

Kamali: कमळी मालिकेत नवा ट्विस्ट; थिएटरमध्ये कमळीची छेड काढल्यामुळे ऋषीचा संताप अनावर, दोघांच्या नात्याला मिळणार नये वळण

Voter List Scam: महाराष्ट्र, कर्नाटकानंतर केरळातही घोळ; एकाच पत्त्यावर ९ जणांची बनावट मतदार नोंदणी

Maharashtra Live News Update: नागपूर शहरातील काही भागात पावसाला सरीना सुरूवात

Cabinate Decision: रेशन दुकानदारांना आता क्विंटलमागे १७० रुपये मार्जिन; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, पाहा, VIDEO

SCROLL FOR NEXT