Manish Sisodia Latest Update Saam TV
देश विदेश

Manish Sisodia News : मनीष सिसोदियांना मोठा झटका; जामीन अर्ज फेटाळतानाच हायकोर्टाची महत्वाची टिप्पणी

Delhi liquor policy case : आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिल्ली हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे.

Nandkumar Joshi

Delhi liquor policy case : आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिल्ली हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. मद्य अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात सिसोदियांनी केलेला जामीन अर्ज कोर्टानं फेटाळून लावला आहे.

मनीष सिसोदिया (Manish Sisodia) सध्या दिल्लीतील मद्य अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात तुरुंगात आहेत. त्यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) आव्हान दिले होते. कनिष्ठ न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. मात्र, दिल्ली हायकोर्टाकडूनही सिसोदियांना दिलासा मिळू शकलेला नाही. (Latest Marathi News)

दिल्ली हायकोर्टाने सिसोदियांचा जामीन अर्ज फेटाळतानाच महत्वाची टिप्पणी केली आहे. सिसोदिया यांच्याविरोधात खूपच गंभीर आरोप आहेत. या प्रकरणातील त्यांचा व्यवहारही योग्य नाही. ते साक्षीदारांना प्रभावित करू शकतात. त्यामुळे त्यांना जामीन दिला जाऊ शकत नाही, असे कोर्टाने जामीन अर्ज फेटाळताना नमूद केले आहे. (Breaking Marathi News)

मनीष सिसोदियांनी कनिष्ठ न्यायालयाच्या (Court) निर्णयाला दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले होते. कनिष्ठ न्यायालयाने त्यांना जामीन अर्ज फेटाळला होता. कोर्टात सुनावणीवेळी सीबीआयने सिसोदियांच्या जामिनाला विरोध दर्शवला होता. त्यानंतर कोर्टाने ११ मे रोजी या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता.

सिसोदिया सुप्रीम कोर्टात जाणार

दिल्ली हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात मनीष सिसोदिया हे सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. सिसोदिया हे सुप्रीम कोर्टात जामिनासाठी याचिका दाखल करणार आहेत, अशी माहिती आम आदमी पक्षाने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऐन पावसाळा आणि गणेशोत्सवात महाड तालुक्यात पाणी टंचाईच संकट

Kolhapur Fort : शिवरायांनी ५०० दिवसांहून अधिक काळ वास्तव्य केलेला किल्ला, इतिहासप्रेमींनी नक्की पाहावा

Nagpur : नागपूरमध्ये गौरी विसर्जनादरम्यान भयंकर घडलं! आईसोबत तलावावर गेलेली २ मुले तलावात बुडाली

Manoj Jarange : उपोषणात दौरा चांगला नाही, त्रास होत असल्याने दौरा रद्द करू शकतो, मध्यरात्रीच्या सभेत जरांगे पाटलांचे मोठे विधान

Tharala Tar Mag : अर्जुनवर पुन्हा हल्ला; सायलीचा जीवही धोक्यात, श्वेताचा प्लान फसणार की...| VIDEO

SCROLL FOR NEXT