Manipur Violence Saam Tv
देश विदेश

Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; लष्कर आणि कुकी दहशतवाद्यांमध्ये २ तासांची चकमक, ७५ महिलांची सुटका

75 Women Rescued From Kuki Militants: मणिपूरमध्ये २ तासांचा थरार पाहायला मिळाला आहे. यावेळी कुकी अतिरेक्यांकडून ७५ मैतेई महिलांची सुटका करण्यात आली आहे.

Rohini Gudaghe

मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये सध्या तणावाची स्थिती आहे. यादरम्यान एक मोठी अपडेट समोर येत आहे. लष्कर आणि आसाम रायफल्सची शुक्रवारी रात्री (१७ मे) दोन तास चकमक झाली. यावेळी कुकी अतिरेक्यांकडून ७५ मैतेई महिलांची सुटका करण्यात आली आहे. कांगपोकपी जिल्ह्याच्या पायथ्याला असललेल्या बिष्णुपूर जिल्ह्यातील वारियोसिंग भागातील या महिल्या होत्या. रात्री या भागातून मैतेई महिलांचे कुकी दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं.

आसाम रायफल्सने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये दोन सैनिक संशयित दहशतवाद्यांवर गोळीबार करताना (75 Women Rescued From Kuki Militants) दिसत आहेत. या गोळीबारात मृत्यूच्या तावडीतून सुटलेल्या महिलांनी आसाम रायफल्स आणि लष्कराचे आभार मानल्याची माहिती हिंदुस्थान टाईम्सच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

मणिपूरमध्ये काही सशस्त्र हल्लेखोरांनी नागरिकांवर गोळीबार केला. त्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर (Manipur Violence) दिलं. तेव्हा मणिपूरमध्ये भीषण गोळीबार झाला होता. भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सच्या सुमारे दोन तासांच्या चकमकीनंतर ७५ मैतेई महिलांना वाचवण्यात यश आलं आहे. मे २०२३ पासुन कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये वांशिक (Manipur Violence Update) हिंसाचार सुरू आहे. तेव्हापासून आतापर्यंत २२० हून अधिक लोक मारले गेल्याची माहिती मिळत आहे.

आसाम रायफल्सने दोन सैनिक संशयित दहशतवाद्यांवर गोळीबार करत असल्याचा फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलंय (Manipur Violence News) की, “सेना आणि आसाम रायफल्सने दहशतवाद्यांच्या सशस्त्र हल्ल्यातून गावकऱ्यांची सुरक्षितपणे सुटका केली. भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्स मणिपूरमध्ये सामान्य स्थिती आणण्याच्या आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या संकल्पावर ठाम आहेत. मणिपूरमध्ये तणाव कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha bhandhan 2025 : सुख समृद्धी प्राप्त होणार; या रक्षाबंधनाला ५ राशींच्या लोकांचं आयुष्य चमकणार

Triekadash Yog 2025: १५ ऑगस्टपासून 'या' राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु; बुध-मंगळ तयार करणार पॉवरफुल योग

Todays Horoscope: आज रक्षाबंधन असून आर्थिक निर्णय मार्गी लागतील; वाचा आजचं राशीभविष्य

Rahul Ganghi: मतं चोरुन मोदी पंतप्रधान बनले; राहुल गांधींचा आरोप

Crime News: महिलेच्या पाठीमागून आला अन्...; 'गला घोंटू' गँगची दहशत|Video Viral

SCROLL FOR NEXT