Manipur Violence: पोलिसांनीच पीडित महिलांना जमावाच्या हवाली केलं; मणिपूर घटनेप्रकरणी सीबीआयचा धक्कादायक खुलासा

Manipur Violence Case: मणिपूर हिंसाचारामधील दोन्ही पीडित महिला मदतीसाठी पोलिसांकडे आल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्यांना पुन्हा जमावाच्या हवाली केलं, असा गंभीर आरोप सीबीआयने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून केला आहे.
Manipur Violence Case
Manipur Violence CaseSaam TV
Published On

Manipur Two Women Violence Case

मणिपूर हिंसाचारामधील दोन्ही पीडित महिला मदतीसाठी पोलिसांकडे आल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्यांना पुन्हा जमावाच्या हवाली केलं. त्यानंतर जमावाने विवस्त्र करून पीडितांवर लैंगिक अत्याचार केले आणि धिंड काढली, असा गंभीर आरोप सीबीआयने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून केला आहे.

Manipur Violence Case
Baba Ramdev: बाबा रामदेव यांना मोठा दणका! पतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदी

पोलिसांनी जर वेळीच पावले उचलली असती, तर महिलांना वाचवता आले असते. त्यामुळे इतकी मोठी घटना घडली नसती, असंही सीबीआयने आरोपपत्रात म्हटलं आहे. गेल्या वर्षी मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या मोठ्या घटना घडल्या होत्या. दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली होती.

या संतापजनक घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेप्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली. सध्या या प्रकरणाची सुनावणी गुवाहाटी येथील विशेष न्यायालयात सुरू आहे.

आतापर्यंत या प्रकरणात ६ जण आणि एका अल्पवयीन मुलाविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याशिवाय पोलिस कर्मचाऱ्यांवर विभागीय कारवाईही करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणात मुख्य आरोपी म्हणून पोलिसांकडे पाहिलं जात असून सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रातही पोलिसांवरच बोट ठेवण्यात आलं आहे.

"पोलिसांनी पीडितांना जमावाच्या हवाली केलं"

जमावाने विवस्त्र करून धिंड काढण्यापूर्वी दोन्ही पीडित महिला पोलिसांकडे मदतीसाठी आल्या होत्या. त्या पोलिसांच्या वाहनात जाऊन बसल्या. परंतु चावी नसल्याचे कारण देत पोलिसांनी गाडी चालवली नाही. तेव्हा मोठा जमाव तिथे आला. जमावाला पाहताच पोलिसांनी तेथून पळ काढला. यानंतर जमावाने दोन्ही महिलांना पोलिसांच्या वाहनातून बाहेर काढून त्यांच्यावर अत्याचार केल्याचं सीबीआयने आरोपपत्रात म्हटलंय.

Manipur Violence Case
Arvind Kejriwal: निवडणुकीपूर्वी केजरीवालांना अटक का? कोर्टाने ईडीला विचारले हे 5 प्रश्न

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com