SC on Manipur Viral Video Case Sam TV
देश विदेश

Manipur Viral Video Case: 'सुनावणी होईपर्यंत पीडित महिलांचे जबाब नोंदवू नका...' सर्वोच्च न्यायालयाचे CBIला निर्देश

SC on Manipur Viral Video Case: सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी काल या प्रकरणी राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. या प्रकरणात आतापर्यंत सहा हजार FIR दाखल झालेत.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, प्रतिनिधी..

Supreme Court On Manipur Violence:

मणिपूर प्रकरणाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी काल या प्रकरणी राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. या प्रकरणात आतापर्यंत सहा हजार FIR दाखल झालेत. त्यांची माहिती खंडपीठासमोर सादर करण्याचे निर्देश मणिपूर राज्य सरकारला दिले. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला महिलांचे जबाब नोंदवण्याबाबत महत्वाचे निर्देश दिले आहेत.

मणिपूर प्रकरणाची सुनावणी सध्या सर्वोच्च (Supreme Court) न्यायालयात सुरू आहे. कालपासून सुरू असलेल्या या सुनावणीमध्ये काही महत्त्वाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सुनावणी होईपर्यंत सामूहिक बलात्कार करून त्यांची विवस्त्र धिंड काढलेला महिलांचे जबाब नोंदवू नयेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत.

तसेच महिलांची ओळख समोर येऊ नये यासाठी त्यांची नाव देखील वेगळी ठेवली गेली आहेत. महिलांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी कोर्ट एक पॅनल देखील बनवू शकते. कालच्या सुनावणी वेळी कोर्टाने FIR ला उशीर झाल्यामुळं ताशेरे ओढले होते.

दरम्यान, मणिपूर हिंसाचारप्रकरणाचे संसदेतही पडसाद (Parliament Monsoon Session 2023) उमटताना पाहायला मिळत आहेत. विरोधक मोदींकडून मणिपूरमधील महिला अत्याचार, दंगलीवर स्पष्टीकरण हवे आहे. यासाठी विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यावर चर्चेची वेळ जाहीर करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT