मणिपूरमधील राजकारण तापलं असून नितीश कुमार यांच्या जनता दल यूनाइटेड पक्षात मोठी उलाढाल झालीय. मणिपूरच्या जेडीयूचे प्रदेशाध्यक्षाला पदावरून हटवण्यात आले आहे. भाजपची साथ सोडण्याची घोषणा करताच नितीश कुमार यांच्याकडून त्यांना पदावरून हटवण्याची ही कारवाई करण्यात आलीय. मणिपूरचे प्रदेशाध्यक्ष के. विरेन सिंह यांनी मणिपूरमध्ये जेडीयू एनडीएपासून वेगळं होणार असल्याची घोषणा केली होती.
त्यासंदर्भात त्यांनी राज्यपाल यांना पत्रदेखील दिलं होतं. राज्यपाल यांना देण्यात आलेल्या पत्राची बातमी माध्यमांमध्ये आल्यानंतर नितीश कुमार यांनी मोठी कारवाई करत के. विरेन सिंह यांची पदावरून हकालपट्टी केलीय. "एनडीएमधून बाहेर होण्याची बातमी ही दिशाभूल करणारे आणि निराधार आहे. पक्षाने त्याची दखल घेतलीय. पक्षाच्या मणिपूर युनिटच्या अध्यक्षांना त्यांच्या पदावरून मुक्त करण्यात आल्याचं जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन यांनी सांगितलं.
आम्ही एनडीएला पाठिंबा दिला आहे आणि मणिपूरमधील एनडीए सरकारला आमचा पाठिंबा भविष्यातही कायम राहील. मणिपूरमधील नेत्यांचं केंद्रीय नेतृत्वाशी कोणताही संवाद झाला नाही, त्यांनी विश्वासात घेतलं नाही. त्यांनी स्वत: पत्र लिहिले होते. याला अनुशासनहीनता मानून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. त्यांना पदावरून दूर करण्यात आले आहे. आम्ही एनडीएसोबत आहोत आणि राज्य युनिट मणिपूरच्या जनतेची सेवा करत राहून राज्याच्या विकासात योगदान देत राहील, असं राजीव रंजन यांनी म्हटलंय.
विरेन सिंह यांनी मणिपूरच्या राज्यपाल यांना पत्र लिहून एनडीएमधील समर्थनं काढून घेत असल्याचं सांगितलं होतं. मणिपूरमध्ये अब्दुल नासिर हेच जेडीयूचे एकमात्र आमदार आहेत. त्यांना सभागृहात विरोधी सदस्य करावं असं विरेन सिंह यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं. राज्यपाल यांना समर्थन मागे घेण्याचं वृत्त समोर येताच पक्षाकडून कारवाई करण्यात आलीय.. मणिपूर प्रदेशाध्यक्षपदावरून हटवून नितीश कुमार यांनी आपला मित्रपक्ष भाजपला मणिपूरमध्ये पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला नसल्याचे संकेत दिलेत.
२०२२ मध्ये मणिपूर या ईशान्येकडील राज्यामध्ये विधानसभेच्या ६० जागांसाठी निवडणुका झाल्या. त्यावेळी जेडीयूने ६ जागा जिंकून सर्वांना चकित केलं होतं. २०२२ मध्ये नितीश कुमार यांनी एनडीए सोडले तेव्हा मणिपूरमधील जेडीयूचे ५ आमदार भाजपमध्ये सामील झाले. मात्र गेल्या वर्षी नितीश एनडीएमध्ये परतले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.