देश विदेश

Manipur Government: मणिपूरमध्ये पुन्हा एनडीएचं सरकार; सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग,भाजपला किती आमदारांचा पाठिंबा?

Manipur Government NDA News : मणिपूरमध्ये सत्तास्थापन करण्यासाठी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पुन्हा एकदा हालचाली सुरू केल्यात.

Bharat Jadhav

जातीय संघर्षात होरपळणाऱ्या मणिपूरमध्ये राजकीय वातावरण तापलंय. सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी मणिपूरमध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असल्याचं चित्र दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठविल्यानंतर एनडीएच्या १० आमदारांनी आज राज्यपाल अजय भल्ला यांची भेट घेतली. राजभवनात भेट घेतल्यानंतर राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे ४४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा, असा दावा आमदारांनी केला. त्यामुळे मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट हटवून राज्यात नवीन सरकार स्थापन होईल का? हे पाहावे लागले.

मणिपूरमध्ये घटनेच्या अनुच्छेद ३५६ नुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलीय. पण तरीही विधानसभा स्थगित ठेवण्यात आली होती. त्यामुळे राज्यात पुन्हा लोकनियुक्त सरकार स्थापन करण्याचा पर्याय आहे. आज दुपारी एनडीएचे दहा आमदार सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनात गेले. त्यांनी राज्यपाल अजय भल्ला यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला.

भाजपचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल - राधेश्याम सिंह

भाजपचे केंद्रीय नेतृत्व सत्ता स्थापनेबाबत निर्णय घेईल. पण , आम्ही तयार आहोत असे म्हणणे म्हणजे सरकार स्थापनेचा दावा करण्यासारखे आहे," असे आमदार राधेश्याम सिंह म्हणाले. विधानसभा अध्यक्ष सत्यव्रत यांनी वैयक्तिक आणि संयुक्तपणे ४४ आमदारांची भेट घेतलीय. नवीन सरकार स्थापनेला कोणीही विरोध केलेला नाही. "लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे," मागील कार्यकाळात कोरोनामुळे दोन वर्ष वाया गेली आणि आता जातीय संघर्षामुळे एक वर्ष वाया गेले असं विधानसभा अध्यक्ष सत्यव्रत म्हणाले.

राज्यपालांची भेट घेणाऱ्या १० आमदारांपैकी एक असलेले आमदार शेख नुरुल हसन म्हणाले की, लोकाभिमुख सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्याकडे ४४ आमदारांचा पाठिंबा आहे. माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्याशी जवळीक असलेले आमदार एल. सुसिंद्रो मैतेई यांनी या घडामोडींबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचं सांगितले. “आज राज्यात जी राजकीय घडामोड घडली, तिची मला काहीच कल्पना नाही. फक्त बहुमत असल्याचा दावा करीत काही आमदारांनी सरकार स्थापनेसाठी पुढे येणं योग्य नाही.

किती आमदारांचा पाठिंबा?

‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, राजभवनात राज्यपालांची भेट घेण्याऱ्यांमध्ये १० आमदारांमध्ये भाजपचे युमनाम राधेश्याम सिंह, थोकचोम राधेश्याम सिंह, लौरेम्बम रामेश्वर मैतेई, थांगजाम अरुणकुमार, केएच. रघुमणी सिंह, चोंगखम रोबिंद्रो सिंह आणि पाओनम ब्रोजेन सिंह या आमदारांचा समावेश होता. त्यानंतर एनपीपीचे आमदार शेख नुरुल हसन, जुंगेमलुंग तसेच अपक्ष आमदार सपम निशिकांत हेही या गटात सहभागी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT