Earthquake Saam Tv
देश विदेश

Manipur, Meghalaya Earthquake : मेघालय, मणिपूर भूकंपाच्या धक्क्याने हादरलं; नागरिक भयभीत

मणिपूरमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Vishal Gangurde

Earthquake News : मणिपूरमधून मोठं वृत्त समोर आलं आहे. देशासहित जगातील विविध देशात भूकंपाच्या धक्क्याने जमिनी हादरत आहेत. याचदरम्यान, मणिपूर, मेघालयमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तसेच अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तानमध्ये देखील भूकंमामुळे जमीन हादरली आहे. (Latest Marathi News)

जगभरात सातत्याने भूकंपाच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपाने मोठी जीवितहानी झाली होती. अन्य देशातील लोक देखील भूकंपाच्या भीतीने भयभीत आहेत. याचदरम्यान, मंगळवारी मणिपूरच्या (Manipur) नोनीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. मणिपूरसहित अफगानिस्तान आणि तजाकिस्तान या देशातील जमीन देखील भूकंपाच्या धक्क्याने हादरली.

मीडिया रिपोर्टनुसार, तजाकिस्तानमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अफगणिस्तानमध्ये भूकंपाची तीव्रता ४.१ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे.

मणिपूरच्या नोनीमध्ये ३.२ तीव्रतेचा भूकंप

राष्ट्रीय भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. हा भूकंपाचा धक्का मंगळवारी रात्री २ वाजून ४६ मिनिटांनी जाणवला. १९ फेब्रुवारीला आंध्रप्रदेशच्या नंदीगामा शहरातही भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर अनेक नागरिक घर सोडून रस्त्यावर पळाले.

मेघालयमध्ये पुन्हा भूकंप

भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये भूकंपाची मालिका सुरूच आहे. मेघालयामध्ये 16 फेब्रुवारी रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.9 इतकी मोजली गेली. त्यानंतर पुन्हा एकदा मेघालय (Meghalaya) भूकंपाच्या धक्क्याने हादरलं आहे.

मेघालयातील तुरा येथे ३.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का जाणवला आहे.ईशान्यकडील भागातील राज्यात ५ तासांपेक्षा कमी कालावधीत दुसरा भूकंपाचा धक्का जाणवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT