Locket Chatterjee News: मणिपूर महिला अत्याचार प्रकरणाचे पडसाद देशभर उमटत आहेत. मणिपूर आणि पश्चिम बंगाल महिला अत्याचार प्रकरणावरून भाजप खासदार लॉकेट चटर्जी यांना अश्रू अनावर झाले. महिला अत्याचाराचा उल्लेख करत खासदार लॉकेट चटर्जी या भर पत्रकार परिषदेतच रडल्या. यावेळी त्यांनी सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. (Latest Marathi News)
भाजप खासदार लॉकेट चटर्जी म्हणाल्या, 'व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आपण लोक बोलत आहोत? आता काँग्रेसने ममता बॅनर्जी यांना साथ दिली आहे. विरोधकांनी आघाडीला INDIA नाव दिलं आहे. बंगालमधील प्रकरणावर मात्र सोनिया गांधी गप्प का आहेत? प्रियंका गांधी गप्प आहेत? कारण ममता बॅनर्जी यांनी त्यांना साथ दिली आहे. सर्व राज्यात जाऊन या रडतात. मात्र, बंगालमध्ये आल्यावर ही मंडळी काहीच बोलत नाही'.
लॉकेट चॅटर्जी पुढे म्हणाल्या, 'एकापाठोपाठ एक महिला अत्याचाराच्या घटना पश्चिम बंगालमध्ये घडत आहेत. मात्र, या प्रकरणावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या महिला असून शांत आहे', असं म्हणत लॉकेट चॅटर्जी भर पत्रकार परिषदेत रडू लागल्या. 'आम्ही कोणाकडे जायचं? आम्ही देखील महिला आहोत. मणिपूर अत्याचारातील पीडित महिला आपल्या देशाची लेक आहे. पश्चिम बंगाल देखील आपल्या देशातच आहे'.
भाजप खासदार चॅटर्जी पुढे म्हणाल्या, 'काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमधील घटनेवर भाष्य केलं. देशातील मुलींसाठी सर्व राज्यात कायदा कडक असला पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली. मणिपूरची पीडित महिला या देशाची लेक आहे'.
चॅटर्जी पुढे म्हणाल्या, 'पंचायत निवडणुकीला ८ जुलै रोजी एका महिला उमेदवारासोबत गैरवर्तवणूक करण्यात आली. ११ जूनला मतदानाच्या दिवशी तृणमूलच्या महिला उमेदवारावर मतमोजणी केंद्रात अत्याचाराची घटना घडली. यावर मुख्यमंत्री बॅनर्जी भाष्य करणार नाहीत का? त्यांचासाठी कोणी बोलणार नाही का? कालियागंज येथील पंचायत निवडणुकीच्या पहिल्या दिवशी एका महिलेवर अत्यारावर करून तिची हत्या करण्यात आली'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.