Manipur Clash file Photo ANI
देश विदेश

Manipur Clash : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; ३ जणांची गोळ्या झाडून हत्या, संचारबंदी लागू

Manipur Clash : हल्लेखोरांनी लिलोंग चिंगजाओ भागातील स्थानिक लोकांना लक्ष्य करत त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत ३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ५ जण जखमी झालेत. मणिपूरमधील इंफाळ घाटीमध्ये राहणारे मैतेई आणि डोंगरराळ भागात राहणारे कुकी या दोन्ही समाजात जातीय हिंसाचार उफाळून आला आहे.

Bharat Jadhav

Curfew Reimposed In Manipur Five Districts:

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार झाल्याची माहिती समोर आली आहे.थौबल जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी ३ जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली यात ५जण जखमी झाल्याचे वृत्त इंडिया टीव्ही या वृत्त वाहिनीने दिले आहे. अद्याप हल्लेखोरांची ओळख पटलेली नाहीये. हल्लेखोरांनी लिलोंग चिंगजाओ भागातील स्थानिक लोकांना लक्ष्य करत त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत ३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ५ जण जखमी झालेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (Latest News)

गोळीबारीच्या (firing) घटनेनंतर स्थानिक नागरिक संतप्त झाले असून त्यांनी तीन वाहने पेटवून दिलीत. या घटनेनंतर थौबल, इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, कक्चिंग आणि बिष्णुपूर जिल्ह्यात पुन्हा कर्फ्यू(Curfew) लागू करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. मणिपूरमधील इंफाळ घाटीमध्ये राहणारे मैतेई आणि डोंगरराळ भागात राहणारे कुकी या दोन्ही समाजात जातीय हिंसाचार उफाळून आला होता.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आतापर्यंत १८० हून अधिक लोकांचा मृत्यू

मणिपूरमध्ये (Manipur) ३ मे २०२३ रोजी जातीय हिंसाचाराचा उद्रेक झाल्यापासून १८० हून जास्त लोकांचा मृत्यू झालाय. तसेच शेकडो लोक जखमी झालेत. बहुसंख्य मैतेई समुदायाच्या मागणीला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या निषेधार्थ मणिपूरमध्ये ३ मे २०२३ रोजी 'आदिवासी एकता मार्च' काढण्यात आला तेव्हा हिंसाचार झाला होता. मणिपूरच्या लोकसंख्येच्या ५३ टक्के लोकसंख्या मैतेई आहे आणि ते बहुतेक इंफाळ खोऱ्यात राहतात. आदिवासी- नागा आणि कुकी ४० टक्क्यांहून थोडे जास्त आहेत, ते डोंगराळ भागातील जिल्ह्यांमध्ये राहतात.

मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी काय म्हणाले

मणिपूरचे मुख्यमंत्री (Chief Minister) एन बिरेन सिंह (N Biren Singh) यांनी या हिंसाचाराचा निषेध केलाय. तसेच त्यांनी लिलाँगमधील रहिवाशांना शांतता राखण्याचे आवाहन केलंय. सध्या गुन्हेगारांना पकडण्याचे काम सध्या पोलीस करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Maharashtra News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलली तातडीची बैठक

भीमनवार सक्तीच्या रजेवर, मुंढेंच्या हाती सूत्रे! पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित, मध्यरात्री मोठ्या घडामोडी

Tea Leaves : फक्त १ चमचा चहापत्ती आणि केस होतील मजबूत, आठवडाभरात दिसेल चमत्कारिक फरक

ज्ञानेश कुमारांविरोधात दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत आंदोलनाचा धडाका,कधी-कधी झाले आंदोलनं?

SCROLL FOR NEXT