Gangster Goldy Brar: कुख्यात गँगस्टर गोल्डी बरारवर मोठी कारवाई, UAPA अंतर्गत दहशतवादी घोषित

Gangster Goldy Brar News: कॅनडात राहून भारतात गुन्हेगारी कारवाया करणारा कुख्यात गँगस्टर गोल्डी बरारवर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. दहशतवाद प्रतिबंधक कायदा UAPA अंतर्गत दहशतवादी घोषित केलं आहे.
Gangster Goldy Brar
Gangster Goldy BrarSaam Digital
Published On

Gangster Goldy Brar

कॅनडात राहून भारतात गुन्हेगारी कारवाया करणारा कुख्यात गँगस्टर गोल्डी बरारवर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. दहशतवाद प्रतिबंधक कायदा UAPA अंतर्गत दहशतवादी घोषित केलं आहे. त्याचे बब्बर खालसा या खलिस्तानी संघटने सोबत संबंध आहेत. तसचे भारतातील अनेक मोठ्या कारवायांमध्येही त्याचा सहभाग आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा गोल्डी उजवा हात असल्याची माहिती समोर आली असून पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणाचा सूत्रधार माणला जातो. गोल्डीला दहशतवादी घोषित करत असल्याची नोटीस गृहमंत्र्यालयाकडून जारी करण्यात आली आहे.

गँगस्टर गोल्डी बरारचं मूळ नाव सतींदर सिंग उर्फ सतींदर सिंगजीत सिंग आहे. २०२१ मध्ये तो भारतातून पळून गेला आहे. तेव्हापासून तो कधी कॅनडा तर कधी अमेरिकेतून दहशतवादी कारवाया करत आहे. एका मॉड्यूलच्या माध्यमातून तो पंजाबसह अनेक राज्यांमध्ये गुन्हेगारी कारवाया करत असतो. गृहमंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेशी त्याचा संबंध असल्याचं म्हटलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gangster Goldy Brar
New Hit-and-Run Law:ट्रक चालकांनी का पुकारलं आंदोलन; सरकारच्या कोणत्या कायद्याचा होतोय विरोध

गोल्डी बरार पंजाबच्या श्री मुक्तसर साहेबाचा रहिवाशी आहे. ११ एप्रिल १९९४ मध्ये त्याचा जन्म झाला असून सध्या त्याचे कॅनडातील ब्रॅम्प्टनमध्ये वास्तव्य असल्याची माहिती मिळाली आहे. कॅनडातील खलिस्तानी समर्थक गटांशी संगनमत करून भारतविरोधी कारवाया सुरू आहेत. सोशल मीडियावर याची घोषणा करून त्याने याची जबाबदारीही स्वीकारली आहे.

Gangster Goldy Brar
2024 Loksabha Election: लोकसभेसाठी प्लान तयार; काँग्रेसचा २९० जागांवर दावा? आघाडीतील इतर पक्षांसाठी १०० जागा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com