narendra modi x
देश विदेश

Politics : भाजपला मोठं खिंडार, ४३ पदाधिकाऱ्यांनी दिला सामूहिक राजीनामा

Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मणिपूर दौऱ्याआधी भारतीय जनता पक्षाला मणिपूर राज्यामध्ये मोठा धक्का बसला आहे. या राज्यातील तब्बल भाजपच्या ४३ पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

Saam Tv

  • मणिपूरमध्ये भाजपला मोठा धक्का, तब्बल ४३ पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा.

  • मोदींच्या दौर्‍याआधी फुंगयार मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला.

  • सल्लामसलत व आदराच्या अभावामुळे नाराज कार्यकर्त्यांचा पक्षत्याग.

Politics News : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या काही दिवसांमध्ये मणिपूरच्या दौऱ्यावर जाणार आहे. मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमधील भारतीय जनता पक्षाच्या ४३ पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सामूहिक राजीनाम्यामुळे मणिपूर राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार (११ सप्टेंबर) मणिपूरमधील फुंगयार मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या ४३ सदस्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा देत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या एका नेत्याने ही माहिती दिली आहे. या राजीनामा सत्रामुळए नरेंद्र मोदी यांच्या मणिपूर दौऱ्याआधी भाजपला मणिपूरमध्ये धक्का बसला आहे.

मणिपूरच्या नागा-बहुल जिल्ह्यातील भाजपच्या फुंगयार मंडळाचा अध्यक्ष, महिला, युवा आणि शेतकरी मोर्चाच्या प्रमुख यांचा राजीनामा देणाऱ्यांमध्ये समावेश आहे. याशिवाय मतदारसंघाच्या बूथ अध्यक्षानेही भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबाबत भारतीय जनता पार्टीतून राजीनामा देणाऱ्या सदस्यांनी निवेदन देखील जारी केले आहे.

'पक्षातील सध्याच्या परिस्थितीबद्दल आम्ही चिंतित आहोत. तळागळातील नेतृत्वाला सल्लामसलत, समावेशकता आणि आदर न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय जनता पक्ष आणि पक्षाची विचारसरणीवरील आमची निष्ठा अजूनही कायम आहे. आम्ही मणिपूरच्या लोकांच्या व समाजाच्या भल्यासाठी आम्ही नेहमीच काम करत राहू' असे या सदस्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बीडच्या विद्यार्थिनीचं थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र

खबऱ्यांकडून टीप मिळाली, हायवेवर ट्रक अडवून झडती घेतली; बिश्नोईला बेड्या ठोकल्या! नेमकं काय घडलं?

ZP Election: ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का; उमेदवारी नाकारताच कमळाकडे धाव, बड्या नेत्यानं पक्षाला ठोकला रामराम

India Tourism : धबधबे, डोंगररांगा अन् थंड वारा; हनिमूनसाठी बेस्ट आहे निसर्ग सौंदर्याने नटलेले 'हे' हिल स्टेशन

राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ, उद्धव ठाकरे राज ठाकरेंवर नाराज; दोन भावांची युती तुटणार?

SCROLL FOR NEXT