Mangaluru Accident Video Saam Tv
देश विदेश

Viral Video: मुलीच्या धाडसाचं कौतुक करावं तेवढं कमी, अपघातातून असं वाचवलं आईचं प्राण; पाहा थरारक VIDEO

Mangaluru Auto Accident Video: मंगळुरूमध्ये भरधाव रिक्षाने एका महिलेला चिरडले. या महिलेच्या मुलीने तिचे प्राण वाचवले. अक्षरश: या मुलीने रिक्षा उचलून त्याखाली अडकलेल्या आपल्या आईला बाहेर काढले. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

मंगळुरूमध्ये रिक्षाला भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या रिक्षाखाली एक महिला चिरडली गेली. या महिलेचे प्राण वाचवण्यासाठी तिची मुलगी धावून आली आणि तिने चक्क रिक्षाला उचलून आईला रिक्षाखालून बाहेर काढले. सोशल मीडियावर या अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या शाळकरी मुलीच्या धाडसाचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. या मुलीला शौर्य पुरस्कार देण्यात यावा, असे आवाहन नेटकरी करत आहेत.

मंगळुरूच्या किन्निगोली येथे ही अपघाताची घटना घडली. भरधाव रिक्षाने एका महिलेला चिरडले. या महिलेच्या शाळकरी मुलीने तिचे प्राण वाचवले. रिक्षाखाली अडकलेल्या आईचे प्राण वाचवण्यासाठी या शाळकरी मुलीने रिक्षाला उचलले. ही संपूर्ण अपघाताची थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला भरधाव ऑटो रिक्षाने धडक दिली. धडक दिल्यानंतर ऑटो रिक्षा महिलेच्या अंगावर पडली. आईला रिक्षाने धडक दिल्याचे पाहून तिची मुलगी मदतीसाठी धावून आली. तिने ऑटो-रिक्षाला उचलले आणि आपल्या आईचे प्राण वाचवले.या मुलीने फक्त आईचे नाही तर रिक्षामध्ये असलेल्या आणखी एका प्रवाशाचे प्राण वाचवले.

या मुलीच्या धाडसी प्रयत्नांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. प्रत्येक जण सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. नेटिझन्सनी मुलीच्या धैर्याचे आणि सामर्थ्याचे कौतुक केले आणि तिच्यासाठी शौर्य पुरस्काराची मागणी केली.

'त्या मुलीला काहीतरी पुरस्कार द्यायलाच हवा. व्हिडिओ काढण्याऐवजी तिने लगेच मदतीसाठी उडी घेतली. आम्हाला तिच्यासारख्या आणखी तरुणांची गरज आहे.', असे मत काही युजर्सनी व्यक्त केले. 'ब्राव्हो, गर्ल पॉवर.' 'खरंच ही मुलगी कौतुकास पात्र आहे.', असे मत काही युजर्सनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT