Man Trapped on Mountain Saam Tv
देश विदेश

Man Trapped on Mountain: टेकडीच्या कड्यांमध्ये तीन दिवसांपर्यंत अडकून पडला, जवानांनी वाचवला तरुणाचा जीव

भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या संयुक्त कारवाईनंतर दोन टेकड्यांमध्ये अडकलेल्या तरुणाला दोरीच्या साहाय्याने या वाचवण्यात यश आले

वृत्तसंस्था

तिरुअनंतपुरम: केरळमध्ये तीन दिवसांपासून दोन टेकड्यांमध्ये अडकून पडलेल्या तरुणाची सुटका करण्यात आली आहे. त्याला थेट रुग्णालयात नेण्यात आले आहे. भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या संयुक्त कारवाईनंतर दोन टेकड्यांमध्ये अडकलेल्या तरुणाला दोरीच्या साहाय्याने या वाचवण्यात यश आले (Man Trapped on Mountain At Palakkad Kerala Indian Army Rescued Him After 3 Days).

तरुण टेकड्यांमध्ये कसा अडकला?

तीन दिवसांपूर्वी केरळ (Kerala) च्या पलक्कड जिल्ह्यात ट्रेकिंगला गेलेल्या आर बाबू नावाच्या तरुणाचा पाय घसरला आणि तो दोन टेकड्यांमध्ये अडकला. त्यानंतर बाबूने स्वतः त्याची वाट पाहत असलेल्या लोकांना या अपघाताची माहिती दिली.

आर बाबू अडकल्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश न आल्याने त्यांनी स्थानिक प्रशासनाला याची माहिती दिली. सोमवारी रात्री उशिरापर्यंत यश न मिळाल्याने मंगळवारी पुन्हा प्रयत्न करण्यात आले. मात्र, तरीही यश आले नाही. जवळपास दोन दिवस आर बाबूला अन्न-पाणीही मिळाले नाही. यानंतर स्थानिक आमदार ए. प्रभाकरन यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हा मंत्री कृष्णनकुट्टी यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची माहिती दिली.

आर बाबूच्या बचावासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) सोबत अनेक पथके गुंतली होती. परंतु उभ्या चढाईच्या डोंगरावर चढणे शक्य नव्हते. यादरम्यान मंगळवारी हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली, मात्र, तरीही यश आले नाही.

मुख्यमंत्र्यांनी लष्कराची मदत मागितली

त्यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी हस्तक्षेप करत तरुणाला वाचवण्यासाठी भारतीय लष्कराची मदत घेतली. यानंतर बंगळुरुहून हवाई दल आणि लष्कर मदतीसाठी पोहोचले.

लष्कराने बचावकार्य राबवत वाचवला तरुणाचा जीव

यानंतर बेंगळुरु (Bangalore) आणि वेलिंग्टन येथून आर्मी टीम आणि इंडियन एअर फोर्स व्यतिरिक्त काही गिर्यारोहक टीम मदतीसाठी पोहोचली. सर्व प्रथम बाबूला अन्न आणि पाणी पुरवण्यात आले. यानंतर लष्कराच्या तज्ज्ञांनी बचाव कार्यासाठी आधुनिक उपकरणे आणि दोरीच्या साहाय्याने बाबूची सुटका केली.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT