Pothole file photo Saam Tv
देश विदेश

Potholes Issue : रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी काढलं कर्ज; प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून व्यक्तीची खास मोहिम

Loan taken for filling potholes : बंगळुरूतील एका टेक प्रोफेशनलने व्यक्तीने वेगळी भूमिका घेत नो डेव्हलपमेंट नो टॅक्स अशी मोहिमच उघडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Bangalore News : रस्त्यावरील खड्डे हा देशातील सर्वच भागात भेडसावणारा प्रश्न आहे. रस्त्याच्या खराब स्थितीमुळे नागरिकांना नाहक मनस्थाप सहन करावा लागतो. खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन नागरिक प्रशासनाच्या नावाने नेहमी खडी फोडताना दिसतात. मात्र बंगळुरूतील एका ३२ वर्षीय टेक प्रोफेशनलने व्यक्तीने वेगळी भूमिका घेत नो डेव्हलपमेंट नो टॅक्स अशी मोहिमच उघडली आहे. या मोहिमेअंतर्गत बंगळुरूतील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे मालमत्ता करावर बहिष्कार टाकण्यात येत आहे.

आरिफ मुदगल यांनी बंगळुरूच्या पूर्व भागातील होसा रोडवर झालेल्या दोन अपघातांनंतर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला. आरिफ यांनी सांगितले की, 14 ऑगस्ट रोजी एक व्यक्ती होसा रोडवरील खड्डयातून जात असताना त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. यात त्याच्या डोक्याला इजा झाली तसेच पायही फ्रॅक्चर झाला आहे. सदर व्यक्ती मंडया येथील रहिवासी असून त्याच्या कुटुंबाचा एकमेव आधार आहे. (Latest Marathi News)

आरिफने आणखी एक घटना सांगितली ज्यात त्याच्या अपार्टमेंटजवळ राहणारी एक महिला ऑटोने जात होती. होसा रोडवरील खड्ड्यात ऑटो आदळल्याने ती जखमी झाली. या सर्व घटना लक्षात घेऊन आरिफ मुदगल यांनी पाच वर्षांपूर्वी काही जणांसह 'सिटिझन्स ग्रुप, ईस्ट बेंगलुरु' नावाचा एक ग्रुप सुरू केला. आरिफ आणि त्यांच्या टीमला त्यांचे काम सुरू ठेवण्यासाठी पैशांची कमतरता होती. त्यासाठी त्यांना 2.70 लाख रुपयांचे कर्ज घेतले.

गटातील इतर सदस्यांनीही खड्डे दुरुस्त करण्यासाठी पैसे जमा केले होते. परंतु निधी कमी पडला. त्यामुळे कर्ज घेण्याचे ठरले. ग्रुपच्या एका सदस्याने सांगितलं की, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आम्ही "NoDevelopmentNo Tax" मोहीम सुरू केली आहे. रस्त्यांच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष न दिल्याने आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्हाला एक टीम बनवावी लागली. नेत्यांची इच्छा नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही मालमत्ता करावर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वसुबारसच्या निमित्ताने रायगडमध्ये गाय आणि वासराच्या पुजनाला माहिलांची गर्दी

Gajanan Vada Pav Dombivli : चाललंय काय? प्रसिद्ध वडपावच्या दुकानात चटणीत आढळल्या अळ्या; ग्राहकांचा संताप

विखे आला आणि महाराष्ट्रात विखार पसरवून गेला, छगन भुजबळांचा विखे पटलांवर हल्लाबोल|VIDEO

मध्यमवर्गीयांना हक्काचं घर मिळणार, मोदी सरकारची सर्वसामान्यांना दिवाळीची भेट

Pune Crime : आधी कोयता दाखवून तरुणांनी नंगानाच केला, पोलिसांनी तासाभरात उतरवला सर्वांचा माज; गावभर काढली धिंड

SCROLL FOR NEXT