Man Stuck In Aircraft Loo Saam Tv
देश विदेश

Mumbai Bengaluru Flight : विमानाच्या टॉयलेटमध्ये अडकला प्रवासी, २ तासानंतर आला बाहेर; नक्की काय घडलं?

Man Stuck In Aircraft Loo: मुंबई-बेंगळुरू स्पाईसजेटच्या फ्लाइटमध्ये एका धक्कादायक घटना घडली आहे. एक प्रवासी टॉयलेटमध्ये दीड तास अडकला होता. नक्की तो कसा अडकला, त्याची सुटका कशी झाली हे आपण सविस्तर जाणून घेवू या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Bengaluru Flight Incident

मुंबई-बेंगळुरू स्पाईसजेट फ्लाइटमच्या एक प्रवासी टॉयलेटमध्ये अडकला होता. मंगळवारी ही घटना घडली आहे. तो सुमारे १०० मिनिटे टॉयलेयमध्ये अडकून पडला होता. त्याची सुटका करणं हे अतिशय अवघड काम होतं. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढण्यात आलंय. याबद्दल आपण सविस्तर जाणून घेवू या. (latest marathi news)

केम्पेगौडा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर (KIA) अभियंत्यांनी टॉयलेटचा दरवाजा तोडला. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. विशेषत: लँडिंगच्या वेळी टॉयलेटमध्ये अडकल्याने या प्रवाशाला मोठा धक्का बसला होता. मंगळवारी पहाटे ३.४२ वाजता फ्लाइट खाली उतरली. तेव्हा अभियंते विमानात चढले. त्यांनी फ्लाइटमधील टॉयलेटचा दरवाजा तोडला आणि दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर त्या प्रवाशाची सुटका केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कशी घडली घटना

१४D सीटवरील प्रवासी टेकऑफनंतर लगेचच सीटबेल्ट काढला आणि तो टॉयलेटमध्ये गेला होता. परंतु टॉयलेटचा दरवाजा खराब झाल्याने तो आत अडकला, अशी माहिती KIA ग्राउंड स्टाफच्या सदस्याने दिली. दरवाजा उघडत नसल्यामुळे प्रवासी घाबरला. त्याने क्रुला कॉल्स करून याची माहिती दिली. प्रवाशाने कॉल केल्यानंतर त्यांनी बाहेरून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. बेंगळुरू विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एक व्यक्ती विमानातून मुंबईहून बेंगळुरूला जात होता. तो धक्कादायकपणे विमानातील शौचालयात अडकला.

प्रसाधनगृहाचा दरवाजा उघडण्याचा कोणताही पर्याय नाही, हे लक्षात आल्यावर एका एअर होस्टेसने तपकिरी कागदावर मोठ्या अक्षरात एक चिठ्ठी लिहिली. ही चिठ्ठी त्या प्रवाशापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या चिठ्ठीमध्ये तिने 'सर आम्ही दरवाजा उघडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. परंतु आम्ही दरवाजा उघडू शकलो नाही. तुम्हा घाबरू नका. आपण काही मिनिटांत उतरणार आहोत, त्यामुळे कृपया कमोडचे झाकण बंद करा आणि त्यावर बसा. मुख्य दरवाजा उघडताच इंजिनियर येईल, असं लिहिलं होतं.

फ्लाइट SG-268 मधील घटना

टॉयलेटमध्ये अडकलेल्या प्रवाशाला दिलासा देण्यासाठी तिने शौचालयाच्या दाराखाली ही चिठ्ठी सरकवली. मंगळवारी पहाटे ३.४२ वाजता फ्लाइट खाली उतरले. अभियंते विमानात चढले, दरवाजा तोडला आणि दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर त्या माणसाची सुटका केली. प्रवाशाला तातडीने प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आलं. फ्लाइट SG-२६८ मध्ये ही घटना घडली आहे. मंगळवारी पहाटे २ वाजता मुंबई विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर ही घटना घडली. याबाबत स्पाईसजेटने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

विमानात रोज काही ना काही घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी पायलटला प्रवाशाने मारहाण केल्याची देखील घटना घडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Swiggy CEO networth : स्विगीचे सीईओंचं शिक्षण आणि नेटवर्थ किती?

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

SCROLL FOR NEXT