Bariely News Saam Tv
देश विदेश

Uttar Pradesh News: पत्नीशी भांडला, नंतर रागात स्वत:लाच पेटवलं; रस्त्यावर पळाल्यानंतर पुढे भयंकर घडलं

Domestic quarrel turns tragic: पतीने पत्नीसोबत झालेल्या वादातून स्वत:वर रॉकेल ओतून पेटवून घेतलंय. ही धक्कादायक घटना बरेलीच्या कँट परिसरात घडली असून, पतीने आधी स्वता:ला पेटवून घेतलं आणि नंतर भर रस्त्यात धावताना दिसला.

Bhagyashree Kamble

एका पतीने पत्नीसोबत झालेल्या वादातून स्वत:वर रॉकेल ओतून पेटवून घेतलंय. ही धक्कादायक घटना बरेलीच्या कँट परिसरात घडली असून, पतीने आधी स्वता:ला पेटवून घेतलं आणि नंतर भर रस्त्यात ओरडत धावताना दिसला. परिसरातील नागरीकांनी लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळेवर आग विझवण्यात न आल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बरेलीच्या सकलेन नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पतीने पत्नीसोबत झालेल्या वादातून स्वत:ला पेटवून घेतलं आहे. मृत व्यक्तीचे नाव सलीम (वय वर्ष ४०) असून, तो भंगार विक्रेत्याचे काम करत होता. रविवारी सलीमचे पत्नीसोबत काही कारणावरून भांडण झाले. भांडणात सलीमचा राग अनावर झाला, त्याने स्वत:वर रॉकेल ओतून घेतलं आणि पेटवून घेतलं.

यादरम्यान, तो बाहेर पडत रस्त्यावर धावला. किमान ५०० मीटर अंतर पळत तो गेला. परिसरातील लोकांनी जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा त्याच्यावर पाणी टाकत आग विझवण्याचा पर्यंत केला. जेव्हा पत्नीला पती आगीमुळे जळत असल्याचं दिसलं, तेव्हा ती प्रचंड घाबरली होती. सलीमला वाचवण्यासाठी सगळ्यांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, इतकी वाढली, की सलीमचे शरीर संपूर्ण जळाले होते.

आग इतकी वाढत गेली की त्यात होरपळून सलीमचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी सलीमचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छदनासाठी पाठवले आहे. या प्रकरणाबाबत कँट पोलीस ठाण्यातील पोलिसांनी माहिती देताना सांगितले, पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर एका व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतलं आहे. त्यामुळे पतीचा मृत्यू झाला आहे. मृतदेह शवविच्छदनासाठी पाठवण्यात आले असून, या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filling 2025: ITR फाइल करताना पासवर्ड विसरलात? काळजी करु नका, या पद्धतीने भरा रिटर्न

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

SCROLL FOR NEXT