Mahakumbh News Saam Tv News
देश विदेश

Mahakumbh Mela 2025: महाकुंभातील चेंगराचेंगरीत बेपत्ता झाला अन् तेराव्यालाच प्रकटला, म्हणाला, 'साधूंबरोबर चिल्लम मारत होतो..'

Miracle at Mahakumbh Prayagraj: संगमाच्या तीरावर झालेल्या चेंगराचेंगरीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समजताच त्यांच्या कुटुंबाने तेराव्याची विधी करायला घेतली. पण तो व्यक्ती तेराव्या दिवशी कुटुंबासमोर प्रकटला.

Bhagyashree Kamble

प्रयागराज महाकुंभात मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे. संगमाच्या तीरावर झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या चेंगराचेंगरीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबाने त्यांचं तेरावे घालणं सुरू केलं होतं.

पण एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. तेराव्याची दिवशी खुंटी गुरु आपल्या घरी परतले. साधूंबरोबर चिल्लम मारत होतो, महाकुंभ मेळ्यात दिवस कसे कधी गेले कळालच नाही, असं म्हणत खुंटी गुरु कुटुंबासमोर प्रकट झाले.

प्रयागराजमधील चाहचंद येथील रहिवासी खुंटी गुरु २८ जानेवारी रोजी मौनी अमावस्येनिमित्त संगम नदीत स्नान करण्यासाठी महाकुंभात गेले होते. मात्र, चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी खुंटी गुरु बेपत्ता झाले होते. कुटुंबाने त्यांचा शोध घेतला. मात्र ते कुठेच सापडले नाहीत.

इतके दिवस खुंटी गुरु घरी न परतल्यामुळे कुटुंबातील सदस्यांना वाटले की त्यांचाही चेंगराचेंगरीत मृत्यू झाला असावा. यानंतर, त्यांच्या कुटुंबियांनी तेराव्याची विधी करण्यास सुरुवात केली. सायंकाळी १३ ब्राह्मणांना जेवण देण्यात येणार होते. दरम्यान, खुंटी गुरु स्वतः रिक्षातून उतरले आणि सर्वांसमोर आले.

ज्या खुंटी गुरुच्या तेराव्या विधीची तयारी सुरू होती, त्यांना प्रत्यक्ष पाहून लोक थक्क झाले. जेव्हा त्यांना इतके दिवस कुठे होते, हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी, साधूंबरोबर काही चिल्लम घेतल्या, इतके दिवस कसे गेले कळालच नाही, असं त्यांनी उत्तर दिलं. त्यांना सुखरूप पाहून कुटुंबाला आनंद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Shopping: चुकूनही या 3 वस्तू ऑनलाईन खरेदी करू नका , पैसे जातील वाया

Gulab Jamun Recipe: तोंडात टाकताच विरघळणारा खव्याचा गुलाबजाम कसा बनवायचा? वाचा ही सिक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update : ऐन सणासुदीचा काळात सातपुड्यातील चांदसैली बनला मृत्यूचा घाट

मुंबई -पुणे मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७-८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा|VIDEO

Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला करा हे 5 लक्ष्मी उपाय, कर्ज आणि आर्थिक अडचणी होतील दूर

SCROLL FOR NEXT