Delhi Crime Saam Tv
देश विदेश

Crime: तरुणाकडून बायको आणि ३ मुलींची हत्या; चाकूने चौघांचा गळा चिरला; दिल्ली हादरली

Delhi Crime News: दिल्लीच्या चंदन पार्क परिसरात चौघांची हत्या करण्यात आली. तरुणाने बायको आणि ३ चिमुकल्या मुलींना संपवलं. चाकूने चौघांचा गळा चिरण्यात आला. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

Priya More

Summary -

  • दिल्लीच्या चंदन पार्कमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली

  • तरुणाने बायको आणि तीन मुलींची हत्या केली

  • चाकूने गळा चिरून चौघांना संपवलं

  • आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला

देशाची राजधानी दिल्लीमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली. एका तरुणाने धारदार चाकूने वार करत बायको आणि ३ मुलींची निर्घृण हत्या केली. दिल्लीच्या चंदन पार्क परिसरात ही घटना घडली. बायको आणि मुलींची हत्या करून आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेमुळे दिल्लीत खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या चंदन पार्क परिसरात आरोपी आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. त्याला तीन मुली होत्या. आरोपी रोजगाराच्या शोधात दिल्लीत आला होता. चंदन पार्क परिसरात तो भाड्याने घर घेऊन राहत होता. तो आजादपूर बाजारात भाजी विक्रीचा व्यवसाय करत होता. आज सकाळी त्याने बायको आणि तीन मुलींची हत्या केली. हत्या झालेल्या महिलेचे नाव अनीता होते. तर हत्या झालेल्यांमध्ये ७, ५ आणि ३ वर्षांच्या मुलींचा समावेश आहे.

आरोपीने बुधवारी सकाळी बायको आणि तीन मुलींची चाकूने गळा चिरून हत्या केली. शेजारच्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. चौघांची हत्या केल्यानंतर आरोपी पळून गेला. कौटुंबीक वादातून त्याने हत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे चंदन पार्क परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याच्या सोधासाठी टीम तयार केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

SCROLL FOR NEXT