Viral Video Saam TV
देश विदेश

Viral Video : स्टंटच्या नादात किंग कोब्राला तोंडात पकडलं; पुढे जे घडलं ते भयंकरच, पाहा VIDEO

King Cobra in Mouth Video : किंग कोब्रा सारखा भयंकर विषारी साप या तरुणाने आपल्या तोंडात पकडला आणि रील व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.

Ruchika Jadhav

किंग कोब्रा असं नाव ऐकलं तरी अनेकांच्या काळजात धस्स होतं. सापांमधील सर्वात विषारी नाग म्हणून किंग कोब्राला ओळखलं जातं. या सापाचा एक दंश जरी झाला तरी व्यक्तीचा जागीच मृत्यू होते. अशा भयंकर विषारी सापासोबत स्टंट करणे म्हणजे स्वताहून मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखे आहे.

सध्या सोशल मीडियावर किंग कोब्रासह स्टंटबाजी करतानाचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुण मुलाने किंग कोब्रा नागाला थेट आपल्या तोंडात पकडलं आहे. असा भयंकर स्टंट करणे या तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. घटनेचा थरारक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवा (वय २० ) असं या तरुणाचं नाव आहे. शिवा तेलंगणामधील कामारेड्डी जिल्ह्यातील देसीपेट गावात राहत होता. त्याचे वडील स्वता एक गारुडी आहेत. त्यांनीच हा नाग पकडून आणला होता. वडिलांनी नाग पकडून आणल्यावर या तरुणाने त्याच्यासोबत रील्स बनवून फेमस व्हायचं असं ठरवलं.

व्हिडिमध्ये तुम्ही पाहू शकता की, या तरुणाने किंग कोब्रा सापाचं तोंड आपल्या तोंडात दातांनी आणि ओठांनी घट्ट धरून ठेवलं आहे. साप आपल्याला चावेल याची जराही भीती या तरुणाच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये. अगदी बिंधास्त त्याने आपल्या तोंडात साप पकडून ठेवला आहे.

साप तोंडात पकडून तरुण सरळ हात जोडून उभा आहे. त्याच्या या स्टंटचा व्हिडिओ दुसऱ्या एका त्याच्याच मित्राने आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. नाग थेट तोंडात पकडल्याने या तरुणाला त्याचा दंश झाला आणि त्याचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT