Mamata Banerjee  SAAM TV
देश विदेश

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना आणखी एक झटका! या नेत्याने पक्षाचा दिला राजीनामा

पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला (Congress) आणखी एक धक्का बसला आहे. माजी राज्यसभा खासदार पवन के वर्मा यांनी TMC चा राजीनामा दिला आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये ते ९ महिन्यापूर्वी आले होते. आता त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ते जनता दलमधून टीएमसीमध्ये आले होते.

माजी खासदार पवन के वर्मा यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. 'ममता बॅनर्जी कृपया माझा पक्षाचा राजीनामा स्वीकारा. तुम्ही मला दिलेल्या आपुलकीबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहेत. मी नेहमी तुमच्या संपर्कात राहण्यास उत्सुक आहे. आपणास शुभेच्छा, असं ट्विट पवन के वर्मा यांनी केले आहे.

माजी खासदार पवन के वर्मा यांची डिसेंबर २०२१ मध्ये टीएमसीचे (TMC) राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पदाधिकाऱ्यांची नवीन समिती स्थापन झाल्यानंतर त्यांना पक्षात कोणतेही औपचारिक पद देण्यात आले नाही.

'त्यांना राज्यसभेवर दुसरी टर्म मिळाली नाही, तेव्हा त्यांनी पक्ष सोडला आणि टीएमसीमध्ये प्रवेश केला. कदाचित त्यांना तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभा हवी होती. तसे झाले नाही तर आता त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, असे खासदार सौगता रॉय म्हणाले.

गेल्या काही दिवसापूर्वी ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्यावर शिक्षक भरती घोटाळ्याचा आरोप आहे. या आरोपनंतर त्यांना मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी त्यांना पक्षातून काढून टाकले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dussehra 2025: दसऱ्याला शस्त्राची पूजा कशी करतात?

Dombivli Shocking : झोपेत दोघींना सापाचा दंश! काल मुलीनं जीव सोडला, आज मावशीचा मृत्यू; डोंबिवलीत हळहळ

Maharashtra Live News Update: पंढरपुरात चंद्रभागा नदीने इशारा पातळी गाठली; नदीकाठी पूरस्थिती

Farmer Rasta Roko : पैठण- संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; ओला दुष्काळ जाहिर करत सरसकट मोबदला देण्याची मागणी

आरक्षणासाठी आणखी एक आत्महत्या, कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, महाराष्ट्र पुन्हा हादरला!

SCROLL FOR NEXT