MAMATA BANERJEE’S NIECE VRISHTI MUKHERJEE FOUND DEAD IN BIRBHUM saam tv
देश विदेश

माजी मुख्यमंत्र्यांच्या भाचीचा खोलीत आढळला मृतदेह; मोठी खळबळ

Mamata Banerjee Niece Vrishti Mukherjee Found Dead At Birbhum Residence: ममता बॅनर्जी यांच्या भाची वृष्टी मुखर्जी बीरभूममधील त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळल्या. रामपूरहाटमधील घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू असून शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Omkar Sonawane

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भाची वृष्टी मुखर्जी या बीरभूम जिल्ह्यातील त्यांच्या निवासस्थानी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी रामपूरहाट परिसरातील कुसुंबा गावातील त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीतून २८ वर्षीय वृष्टी मुखर्जी यांचा मृतदेह आढळला.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन आणि इतर आवश्यक तपासणीनंतरच स्पष्ट होईल. वृष्टी मुखर्जी या ममता बॅनर्जी यांच्या ममेरे भाऊ निहार मुखर्जी यांच्या कन्या होत्या. निहार मुखर्जी हे रामपूरहाटमध्ये तृणमूल काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष राहिले आहेत. वृष्टी यांच्या कुटुंबाचे माहेर रामपूरहाटमधील कुसुंबा गावात आहे. त्या एका स्थानिक शाळेत ग्रुप-सी कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, वृष्टी मुखर्जी गेल्या काही वर्षांपासून नैराश्यात होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते.

सरकारी शाळांमधील भरती रद्द झाल्यानंतर गेली नोकरी

कुटुंबीयांनी सांगितले की, कथित भरती गैरव्यवहाराच्या प्रकरणात सरकारी अनुदानित शाळांमधील नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर वृष्टी यांची नोकरी गेली होती. भरती घोटाळ्याच्या तपासादरम्यान केंद्रीय तपास यंत्रणांना सुमारे ९० टक्के OMR शीटमध्ये अनियमितता आढळल्याचे समोर आले होते. या तपासात वृष्टी मुखर्जी यांच्यासह अनेक उमेदवारांची नावे समोर आली होती. त्यांना कथितरित्या या गैरव्यवहाराचा फायदा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर कायदेशीर कारवाई झाली आणि वृष्टी यांची नोकरी गेली.

पक्ष कार्यालयात आढळला होता आशीष बॅनर्जी यांचा मृतदेह

दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वीही ममता बॅनर्जी यांच्या कुटुंबावर आणि पक्षावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि रामपूरहाटचे पाच वेळा आमदार राहिलेले आशीष बॅनर्जी यांचा मृतदेह बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट येथील पक्ष कार्यालयात आढळला होता. पोलिसांना घटनास्थळावरून एक चिठ्ठीही सापडली होती. आशीष बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल सरकारमध्ये शालेय शिक्षण आणि कृषी यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. तसेच ते विधानसभेचे उपसभापतीही राहिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली

E Challan : आता रस्त्यांवर लोकल पोलिसही कापणार ई-चलान; ट्रॅफिक नियम मोडणाऱ्यांवर वाढणार कारवाई

मुलांच्या जीन्सप्रमाणे मुलींच्या जीन्सला पुढे चैन का असते? जाणून घ्या कारण

Dalchiniche Pani: १५ दिवस रोज दालचिनीचे पाणी प्या, विचार केला नसेल ऐवढे फायदे होतील

जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांचा दुष्काळ? शिक्षकांच्या २,६५७ रिक्त पदांवरून खासदारांचं शाळेच्या आवारात उपोषण सुरु

SCROLL FOR NEXT