Mamata Banerjee news
Mamata Banerjee news  saam tv
देश विदेश

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्ये सीटवर बसताना पडल्या, किरकोळ जखमी

Vishal Gangurde

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या दुसऱ्या दिवशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्ये सीटवर बसताना पडल्या. या घटनेत ममता बॅनर्जी या किरकोळ जखमी झाल्या आहेत . दुर्गापूरमध्ये हेलिकॉप्टरमध्ये चढताना त्यांचा पाय निसटला. यानंतर बॅनर्जी या किरकोळ जखमी झाल्या.

नेमकं काय घडलं?

ममता बॅनर्जी या दुर्गापूरहून आसनसोल येथे जात होत्या. त्या टीएमसी उमेदवार शुत्रघ्न सिन्हा यांच्या नेतृत्वात एका रॅलीला संबोधित करण्यासाठी निघाल्या होत्या. या कार्यक्रमासाठी ममता बॅनर्जी या हेलिकॉप्टरमध्ये बसत असताना त्यांचा पाय निसटला. त्यानंतर त्या पडल्या. या घटनेत त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.

ममता बॅनर्जी या पडल्यानंतर सुरक्षाकर्मचारी त्यांच्या मदतीला धावले. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या काही वेळानंतर दुर्गापूरहून आसनसोल येथे रवाना झाल्या. टीएमसी सूत्रांच्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांना गंभीर दुखापत झालेली नाही. त्या आसनसोल या पक्षातील निवडणुकीच्या रॅलीत सहभागी होणार आहे.

टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी या काही दिवसांपूर्वी दुखापतग्रस्त झाल्या होत्या. त्या घरात ट्रेडमिलवर चालत असताना दुखापतग्रस्त झाल्या होत्या. या घटनेत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. या घटनेनंतर त्यांना तातडीने एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ममता बॅनर्जी यांच्या जखमेवर तीन टाके घालून त्यांना घरी पाठवलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Lok Sabha : भिवंडी मतदारसंघात धक्कादायक प्रकार; हजारो मतदारांची नावं मतदार यादीतून गायब

Astrology: या राशींच्या हातात टिकत नाही पैसा

Benifits of Ashwagandha: अश्‍वगंधा खाल्यामुळे होणारे फायदे ऐकुण व्हाल थक्क...

Lok Sabha Election Voting | मतदानासाठी लांबच लांब रांग, ठाकरे गटाचे नेते संतापले

Maharashtra Lok Sabha Voting Live: देशभरात दुपारी ३ पर्यंत पं. बंगालमध्ये सर्वाधिक तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT