Congress President Election Result
Congress President Election Result Saam TV
देश विदेश

Congress : मल्लीकार्जून खरगे की शशी थरुर? काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. काँग्रेस नेते मल्लीकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) आणि काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) निवडणूकीच्या मैदानात आहे.

गेली २४ वर्ष काँग्रेसचं अध्यक्षपद गांधी कुटुंबाकडे आहे. त्यामुळं काँग्रेसला (Congress) दोन दशकानंतर गांधी कुटुंबाव्यतिरिक्त आज नवीन अध्यक्ष मिळणार आहे. त्यामुळे देशभरातील काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या नजरा आजच्या निकालाकडे लागूण राहिल्या आहेत.

पाहा व्हिडीओ -

मागील 40 वर्षात आत्तापर्यंत फत्त 2 वेळेस काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक झाली आहे. त्यामध्ये 1997 च्या निवडणुकीत सीताराम केसरी यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि राजेश पायलट यांचा पराभव केला होता. या निवडणूकीत सीताराम केसरी यांना 6 हजार 224 तर शरद पवार यांना 882 तर राजेश पायलट यांना 354 मतं मिळाली होती.

मागील 2000 च्या निवडणुकीमध्ये तेव्हा सोनिया गांधी यांच्या विरोधात जितेंद्र प्रसाद यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी जितेंद्र पसाद यांना हरवलं होतं. सोनिया गांधी यांना 7 हजार 448 मत मिळाली होती. जितेंद्र प्रसाद यांना 94 मतं मिळाली होती. तेव्हापासून म्हणजे गेल्या 24 वर्षापासून काँग्रेसचं अध्यक्ष गांधी घराण्याकडेच आहे.

गेल्या 24 वर्षापासून राहुल गांधी आणि सोनिया गांधीच पक्षाचे अध्यक्ष आहेत. 1998 ते 2017 पर्यंतच्या काळात सोनिया गांधी या पक्षाच्या अध्यक्ष होत्या तर 2017 ते 2019 पर्यंत राहुल गांधी हे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यानंतर पुन्हा 2019ते आत्तापर्यंत सोनिया गांधी या पक्षाच्या अध्यक्ष आहेत. त्यामुळं काँग्रेसला गांधी घराण्याच्या व्यतिरिक्त कोणीही अध्यक्ष गेल्या 24 वर्षात मिळालेला नाही. यावेळेस गांधी घराण्याच्या व्यतिरिक्त व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष होणार आहे

2019 च्या झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यानंतर पक्षातील अनेक नेत्यांनी काँग्रेस पक्षाचा हात सोडत काँग्रेसला राम राम ठोकला आहे. त्यामुळं आत्ता होणाऱ्या निवडणुकीत कोण अध्यक्ष होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hardik Pandya Troll: हार्दिकने रोहितलाच केलं प्लेइंग ११ मधून बाहेर! फॅन्सच्या संतप्त प्रतिक्रिया

Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; कोणत्या मार्गावरील सेवा असणार बंद? कोणत्या मार्गावर विशेष सेवा?

Kolhapur News: 'साम टीव्ही'चा लोगो वापरून प्रेक्षकांची दिशाभूल करणारा व्हिडिओ केला व्हायरल, अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल

Today's Marathi News Live : संभाजीनगर शहरात गॅस सिलिंडरचा स्फोटानंतर लागली आग

Special Report : कोकणात रंगणार ठाकरे विरूद्ध ठाकरे लढाई, सभांचा झंझावात

SCROLL FOR NEXT