सर्वाधिक 'इनकमिंग' असलेला राजकीय पक्ष भाजपला तेलंगणात मोठा झटका बसला आहे. भाजपचा राज्यातील फायरब्रँड नेता आणि आमदार टी राजा यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे. पक्षांतर्गत वादाची या राजीनाम्याला किनार असल्याचं मानलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार, तेलंगणामध्ये रामचंद्र राव यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व दिले जाऊ शकते.
टी राजा सिंह यांनी पक्षांतर्गत वादातून भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे बोलले जाते. ते गोशामहलमधून भाजपचे विधानसभेवर प्रतिनिधित्व करत होते. तेलंगणा भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास ते इच्छुक होते, असेही सांगितले जात आहे. तेलंगणाचे भाजप अध्यक्ष जी किशन रेड्डी यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला आहे. मी प्रचंड निराश असून हे पत्र लिहित आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार रामचंद्र राव हे तेलंगणा भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात, अशी माहिती मिळाली. हा निर्णय माझ्यासाठी धक्कादायक होता. हा धक्का केवळ माझ्यासाठीच नाही, तर माझ्यासोबत आस्थेने नेहमी उभ्या असणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांना आहे. मात्र, आज ते सर्व हताश आहेत, असं त्यांनी राजीनाम्यात नमूद केले आहे.
गोशामहलच्या लोकांची सेवा करत राहणार - टी राजा
वादग्रस्त वक्तव्ये आणि कट्टर हिंदुत्ववादी अशी प्रतिमा असलेले टी राजा सिंह यांनी तेलंगणा भाजपमधील नेतृत्वावरून सुरू असलेल्या वादातून राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. टी राजा सिंह हे तेलंगणाच्या गोशामहल विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात. रामचंद्र राव हे तेलंगणा भाजपचे संभाव्य प्रदेशाध्यक्ष होणार असल्यामुळं ते नाराज आहेत, असे सांगितले जाते.
राजीनाम्यानंतर टी राजा म्हणाले की, पक्षातून बाहेर होत असलो तरी हिंदुत्व आणि गोशामहलच्या लोकांची सेवा करत राहणार आहे. आता मी भाजपचा सदस्य नाही. मी पक्षापासून वेगळा होऊ शकतो, पण हिंदुत्व विचारधारा आणि गोशामहलच्या नागरिकांची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहे.
टी राजा यांनी भाजपचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी २०१८ मध्ये गोरक्षाच्या मुद्द्यावर पक्षाकडून पाठिंबा न मिळाल्यानं राजीनामा दिला होता. त्यावेळी पक्षनेतृत्वानं त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता. टायगर नावानं प्रसिद्ध असलेल्या टी राजा यांनी उचललेल्या या पावलानं भाजपमध्ये मोठी खळबळ उडू शकते, असं मानलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.