Major Attack on Pakistani Army Saam Tv
देश विदेश

Pakistan Attack: पाकिस्तानी सैन्यांवर बलूच आर्मीकडून मोठा हल्ला, मेजरसह ४ जवानांचा मृत्यू

Major Attack on Pakistani Army: पाकिस्तानी सैन्य दलाच्या वाहनावर बलूच आर्मीने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये मेजरसह ४ जवानांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी बलूच आर्मीने स्वीकारली आहे.

Priya More

Summary -

  • बलुचिस्तानमध्ये सैन्य दलाच्या ताफ्यावर आयईडीचा स्फोट करून मोठा हल्ला करण्यात आला.

  • मेजर वकार काकरसह ५ पाकिस्तानी जवानांचा मृत्यू झाला.

  • या हल्ल्याची जबाबदारी बलूच लिबरेशन आर्मीने स्वीकारली.

  • सुरक्षा दलाने घटनास्थळाला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली आहे.

पाकिस्तानी सैन्यांवर मोठा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बलूचिस्तान प्रांतात बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्य दलावर हल्ला केला. या हल्ल्यात मेजरसह पाकिस्तानचे ४ सैन्य मारले गेले. बलूच आर्मीने या हल्ल्यामध्ये मेजर काकरला लक्ष्य करत आयईडीचा स्फोट करत त्यांची हत्या केली. या हल्ल्यानंतर बलूच लिबरेशन आर्मीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

मिळालेल्या माहितीनुसार, बलूचिस्तान प्रांतामध्ये पाकिस्तानी सैन्यांना लक्ष्य करत आयईडीचा स्फोट करण्यात आला. या हल्ल्यामध्ये ५ पाकिस्तानी सैन्यांचा मृत्यू झाला. यामध्ये मेजरचा देखील समावेश आहे. ही घटना बलूचिस्तानच्या मांडलो जिल्ह्यातील शांद भागात घडली. पाकिस्तानी सैन्य दलाच्या ताफ्यातील एका वाहनाला लक्ष्य करण्यात आले.

पाकिस्तानी सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या वाहनाला बलूच आर्मीने लक्ष्य केले त्या वाहनातून सैन्य दलाचे जवान प्रवास करत होते. ५ दहशतवाद्यांनी लावलेल्या आयईडीच्या स्फोटामध्ये पाकिस्तानच्या ५ जवानांचा जागीच मृत्यू झाला. कॅप्टन वकार काकर, नायक जुनैद, नायक इस्मत, लान्स नायक खान मुहम्मद आणि शिपाई जहूर या ५ जणांचा मृत्यू झाला. या स्फोटानंतर सुरक्षा दलाकडून घटनास्थळाला घेराव घालत सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

पाकिस्तान सैन्यावर अशाप्रकारे हल्ला करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्य दलावर हल्ले झाले आहेत. आज झालेल्या स्फोटाची जबाबदारी देखील बलूच लिबरेशन आर्मीने घेतली आहे. सतत होणाऱ्या या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी सैन्यांपुढे मोठे आवाहन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलचा क्रिकेट टीमला अलविदा, पोस्ट पाहून चाहते संभ्रमात

Maharashtra Politics: राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना सरकार अधिकाऱ्यांवर मेहरबान; आलिशान वाहनांमुळे राजकारण तापलं

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! १ तोळा इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा 24k -22k अन् 18k चे आजचे ताजे दर

Maharashtra News Live Update : दौंडमध्ये १.४० लाखांचा सिगारेट माल चोरीला, चोरटा सीसीटीव्हीत कैद

ST Bus Rule Change :एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑक्टोबरपासून हा नियम बदलणार; महिला-ज्येष्ठ नागरिकांनी नक्की जाणून घ्या

SCROLL FOR NEXT