Aircraft Crashes into Fire Vehicle at LaGuardia airport Saam Tv
देश विदेश

Accident: एअरपोर्टवर मोठी दुर्घटना, फायर ब्रिगेडच्या वाहनाला विमानाची धडक; पाहा थरारक VIDEO

Aircraft Crashes into Fire Vehicle In America: अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील ला गार्डिया विमानतळावर मोठा अपघात झाला. विमानाची फायर ब्रिगेडच्या वाहनाला धडक दिली. या अपघाताच व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

Summary -

  • न्यूयॉर्कमधील ला गार्डिया विमानतळावर मोठा अपघात

  • फायर ब्रिगेडच्या वाहनाला विमानाची धडक

  • २ जणांचा मृत्यू, ७० पेक्षा अधिक प्रवासी जखमी

  • विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले

इराण-इस्राइल युद्धादरम्यान अमेरिकेत मोठी अपघाताची घटना घडली. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एक मोठा विमान अपघात झाला. न्यूयॉर्कमधील ला गार्डिया विमानतळाच्या रनवेवर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाने अग्निशमन दलाच्या गाडीला धडक दिली. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला तर ७० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघातानंतर विमानतळ बंद करण्यात आले आहे. या अपघाताचा तपास केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमानात १०० पेक्षा अधिक प्रवासी होते. सूचना देऊनही ट्रक थांबला नाही आणि त्याने विमानाला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये विमानाच्या पुढील भागाचे तुकडे झाले. या घटनेनंतर विमानतळ बंद करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व विमाने जेएफके विमानतळावर वळवण्यात आली आहेत.

एअर कॅनडाचे सीआरजे-९०० विमान टॅक्सीवेवरून जात असताना रनवे ४ जवळ हा अपघात झाला. या विमानाला फायर ब्रिगेडच्या गाडीने धडक दिली. या अपघातानंतर अग्निशमन दल आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामध्ये विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातानंतरचा व्हिडीओ समोर आला आहे. अपघातामध्ये २ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ७० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

अपघातापूर्वी, हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने विमान आणि रनवेवरील अग्निशमन दलाचे वाहन या दोघांनाही थांबण्याचे आदेश दिले होते. तरी देखईल हे वाहन पुढे गेले आणि त्याने विमानला धडक दिली. या घटनेनंतर, फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने विमानतळावरील सर्व उड्डाणे थांबवली आणि चौकशी सुरू केली आहे. विमानातील प्रवाशांचीही चौकशी केली जात आहे. या विमानातील बहुतेक प्रवासी ज्यू होते असे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याने काँग्रेस विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निदर्शने...

Layoffs 2026 : नोकर्‍या सांभाळा! प्रसिद्ध कंपनीत नोकरकपात; महिनाभरात 8000 कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार

Summer Foreign Trip : मे महिन्यात फॉरेन ट्रिप प्लान करताय? 'येथे' अनुभवाल कडाक्याची थंडी, भर उन्हाळ्यात भरेल हुडहुडी

टॉयलेटमध्ये गेली, जोरात कुंथल्यानं बेशुद्ध; स्मरणशक्तीच गमावली, १० वर्षांतील घटना विसरली, डॉक्टर चक्रावले

Sunday Horoscope: अक्षय्य तृतीयेला उजळणार या ५ राशींचे नशीब, कामात बढतीचे योग; वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT