Police detain 39 RSS swayamsevaks in Tamil Nadu on Vijayadashami for conducting unauthorized Guru Puja and training program. saamtv
देश विदेश

RSS: दसऱ्याच्या दिवशीच संघाच्या शाखेवर मोठी कारवाई; 39 स्वयंसेवक ताब्यात, काय आहे कारण, जाणून घ्या

39 Swayamsevaks Detained Amid RSS 100th Anniversary Program : विजयादशमीच्या दिवशी, तमिळनाडू पोलिसांनी पोरूरमध्ये १०० व्या वर्धापन दिनानिमित्त सरकारी शाळेत अनधिकृत गुरुपूजा आणि प्रशिक्षण सत्र आयोजित केल्याबद्दल ३९ संघ स्वयंसेवकांना ताब्यात घेतले.

Bharat Jadhav

  • विजयादशमीच्या दिवशी तामिळनाडूमध्ये आरएसएसवर मोठी कारवाई.

  • पोरूर येथे ३९ स्वयंसेवक पोलिसांनी ताब्यात घेतले.

  • विनापरवानगी गुरूपूजा आणि विशेष प्रशिक्षणामुळे कारवाई झाली.

विजयादशमीच्या दिवशी मुर्हूतावरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर कारवाई करण्यात आलीय. आरएसएसचा १०० वा वर्धापन दिन साजरा झाला. देशभरात स्वयंसेवक संघाकडून अनेक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं. याचदरम्यान तामिळनाडूमध्ये मोठा वाद उफाळून आला. तामिळनाडूमधील पोरूर येथे संघाच्या ३९ स्वयंसेवकांना ताब्यात घेण्यात आलंय.

एका सरकारी शाळेत विनापरवानगी पूजा आणि विशेष शाखा प्रशिक्षण आयोजित केल्याच्या आरोपाखाली संघाच्या या स्वयंसेवकांना ताब्यात घेण्यात आलं. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संघाच्या स्वयंसेवकांनी अय्यप्पनथंगल सरकारी उच्च माध्यमिक शाळेमध्ये विनापरवानगी गुरूपूजा आणि विशेष शाखा प्रशिक्षण सत्राचं आयोजन केलं होतं. त्यामुळे या स्वयंसेवकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत केंद्र सरकारने एक विशेष टपाल तिकीट आणि एक विशेष नाणं प्रसिद्ध केलं होतं. केंद्र सरकारच्या या निर्णयावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी टीका केली होती. भारताच्या राष्ट्रपित्याची हत्या करणाऱ्या कट्टरतावादी स्वप्नांना आकार देणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतक महोत्सवानिमित्त देशाचं नेतृत्व टपाल तिकीट आणि नाणी प्रसिद्ध केल्यावरून त्यांनी टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्हा परिषदेचे 21 कर्मचारी निलंबित

Accident News : नवस फेडायला गेले, पण परत आलेच नाहीत; तो गुरुवार ठरला शेवटचा, पुणे अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Nivedita Saraf : "मी भाजपाची कट्टर फॅन..."; बिहारच्या निकालानंतर अभिनेत्री निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत

Free Visa Travel : या ७ देशात भारतीय पर्यटकांना विना व्हिसा फ्रि एन्ट्री

Gold Rate Prediction: महत्त्वाची बातमी! सोन्याचे दर २५,००० रुपयांनी वाढणार; तज्ज्ञांनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT