Petrol Diesel Price SaamTV
देश विदेश

Petrol Diesel Price : महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल महागले; झटपट चेक करा इंधनाचे दर

Petrol Diesel Price News : जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

वृत्तसंस्था

Petrol Diesel Latest Price : आज देशातील जवळपास प्रत्येक राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही ना काही बदल करण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत फारशी वाढ झालेली नाही. मात्र तरीही देशात अनेक ठिकाणी पेट्रोलचा दर 100 रुपयांपेक्षा जास्त आहे. दररोज सकाळप्रमाणे आजही तेल विपणन कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले आहेत.

आज महाराष्ट्रात (Maharashtra) पेट्रोल 0.86 पैशांनी वाढून 106.85 रुपयांवर पोहोचले आहे. तर डिझेल 0.80 पैशांनी वाढून 93.33 रुपयांवर पोहोचले आहे. तसेच छत्तीसगडमध्ये पेट्रोल 0.50 पैशांनी तर डिझेल 49 पैशांनी महागले आहे.

दक्षिण भारतातील तेलंगणा राज्यात पेट्रोल 111.90 रुपये आणि डिझेल 99.90 रुपये दराने विकले जात आहे. उत्तर प्रदेशात पेट्रोल 0.33 पैशांनी तर पश्चिम बंगालमध्ये 0.42 पैशांनी महागलं आहे. झारखंडमध्ये पेट्रोल 0.63 पैशांनी घसरून 100.13 रुपयांवर आले आहे. येथे डिझेल 0.62 पैशांनी कमी होऊन 94.93 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. असे असले तरी देशातील महानगरांमध्ये इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक ; उद्धव ठाकरेंनी दिला कानमंत्र

Shrirampur Vidhan Sabha : श्रीरामपूरमध्ये महायुतीचा पेच कायम; शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांचे अर्ज कायम

Bus Accident : दोन बसचा समोरासमोर अपघात; २५ प्रवासी जखमी, कन्नड- चाळीसगाव बायपास रोडवरील घटना

Nashik News : दिवाळीनिमित्त परिवार बाहेरगावी; बांधकाम व्यवसायिकाच्या घरी २२ लाखांची चोरी

US Election : मतदानाआधी शेवटच्या रॅलीत डोनाल्ड ट्रम्प नाचले; माजी राष्ट्राध्यक्षांची तुलना, VIDEO

SCROLL FOR NEXT