छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिलोड तालुक्यातील धानोरा येथे घडलेल्या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील बाप आणि दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. विहिरीतील साचलेले पाणी काढण्यासाठी उतरलेल्या तिघांवर अचानक विहीर ढासळून मातीचा मोठा ढिगारा कोसळल्याने ही हृदयद्रावक घटना घडलीये.
लातूरच्या उदगीर बिदर रोडवर बामणी पाठीजवळ भीषण अपघात झाला आहे
कार आणि ट्रकचा समोर समोर अपघात झाल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला
तर उदगीर करून हैदराबाद कडे जाणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकला धडक दिली
या अपघातात कार पूर्णपणे चेंदामेंदा झाली आहे
या भीषण अपघातात कारमधील एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला
चंद्रपूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.
शहरातील महाकाली वॉर्ड परिसरातून 9, 13 आणि 15 वर्षे वयोगटातील तीन अल्पवयीन मुले अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
8 मे रोजी ही मुले महाकाली परिसरात खेळत होती. मात्र त्यानंतर ती घरी परतली नाहीत.
मुलांचा सर्वत्र शोध घेऊनही काहीच माहिती न मिळाल्याने चिंताग्रस्त पालकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली असून या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
उल्हासनगरमध्ये पाण्याचा महापूर
फुटलेल्या पाइपलाईनमधून लाखो लिटर पाणी वाया!
एकीकडे पाणी कपात
दुसरीकडे उल्हासनगर पालिकेचा हलगर्जीपणा उघड
शहाड पूर्वेतील उडान पुलाजवळ पाइपलाईन फुटली
पाण्याचे उंच फवाऱ्यांमुळे वाहतूक कोंडी
लहान मुलांचा पाण्यात आनंद
तर पाण्यासाठी त्रस्त नागरिक फुटलेल्या पाइपमधून भरतायत पाणी
नाशिकच्या येवला तालुक्यातील नायगव्हाण येथे भीषण आग
30 ते 35 ट्रॉली चारा जळून खाक
दुग्ध व्यवसायिकाचे मोठे नुकसान
जनावरांसाठी विकत घेतला होता चारा
संध्याकाळच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत चारा पूर्णपणे जळून खाक
मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
० माणगाव शहराच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा
० मुंबई गोवा महामार्गावर माणगाव, इंदापुरमध्ये वाहतुक कोंडी
० कोकणातून सुट्टीचा आनंद लुटून मुंबईकडे निघालेले पर्यटक परतीच्या प्रवासात आडकले
० कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या
० कोकणातून मुंबईकडे परतीच्या प्रवासात निघालेल्या मुंबईकर पर्यटकांना रायगडमध्ये वाहतूक कोंडीचा फटका
डोंबिवली नजीक मानपाडा परिसरातील रुणवाल गार्डन या प्रकल्पात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने संतप्त नागरिकांनी रविवारी बिल्डरच्या कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली. लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सोडवावा, अन्यथा न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
बालगंधर्व चौक ते सावरकर स्मारक असा मूकमोर्चा निघाला
आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी प्रमुख मागणी
काळ्याफिती बांधून याचा निषेध
मूकमोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातल्या वेतन विभागात कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याच समोर आले आहे. वेतन वितरण प्रक्रियेत अनिमित्त आढळल्याने चार जणाविरुद्ध लातूरच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सासवडहून पुण्याला जाणाऱ्या रस्त्यावर दिवे घाटात प्रचंड वाहतूक कोंडी
जवळपास दीड ते दोन किलोमीटर पर्यंत रांगा गाड्यांच्या लागलेल्या आहेत
बस बंद पडल्याने वाहतूक कोंडी ठप्प झाल्याची माहिती..
हडपसर सासवड रोडवर रस्त्याची कामही सुरू आहेत त्यातच बस बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळते.
हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तीस वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून गणेश गायकवाड असे या तरुणाचे नाव आहे.
मुंबईच्या घाटकोपर येथून कल्याणच्या दिशेने जाणार्या एका चारचाकी वाहनाला दुपारच्या सुमारास खारेगाव नाका या ठिकाणी अचानक आग लागली. वाहनाला आग लागल्याचे चालकाचे लक्षात येताच त्याने गाडी रस्त्याच्या कडेला नेली, यामुळे अनर्थ टळला.
सोमवार ११ मे २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मुख्य जलवाहीनीवर तातडीचे दुरुस्ती काम
अंबरनाथ, बदलापूर पश्चिम आणि ऑर्डनन्स फॅक्टरी परिसर प्रभावित
पुढील दोन दिवस कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठ्याची शक्यता
खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला शेतकऱ्यानंतर्फे सुरुवात झाली असून, आता शेतकरी गहू हरभरा काढणीनंतर आता पुन्हा शेती मशागतीच्या कामात जुंपल्याचे दिसून येत आहे, मान्सूनच्या आगमनापूर्वी शेतकरी आता शेत मशागतीच्या कामांत जुंपला असून, नांगरणी आणि बियाणे खते खरेदीची देखील लगबग शेतकरी बांधवांची सुरू आहे.
माजलगाव तालुक्यातील तालखेड फाट्या जवळ आज सकाळी डिझेलने भरलेला टँकर अचानक पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणात डिझेल रस्त्यावर सांडले.
घटनेची माहिती मिळताच आसपासच्या गावांतील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. सांडलेले डिझेल घेण्यासाठी नागरिकांनी अक्षरशः झुंबड उडवली होती.
वारकरी सांप्रदाय, अखिल हिंदू समाज वाघोली यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार पक्ष) प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक करावी यासाठी वाघोली पोलिस ठाण्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी लवांडे यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. दोन दिवसात अटक झाली नाही तर १३ मे रोजी वारकरी सांप्रदाय रस्त्यावर उतरेल असाही इशारा देण्यात आला.
आज सकाळी सीटीसी रोडवर भरधाव वेगात असलेल्या कारचा अपघात झाला.
कार अतिवेगात होती, त्यावेळी चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरला धडकली.
ही धडक इतकी जोरदार होती की कार काही अंतर पुढे जाऊन थांबली.
CNG टँकर चालकांच्या संपामुळे रायगडमध्ये CNG पंप बंद
कोकण फिरायला आलेल्या पर्यटकांना मोठा फटका
नांदेड - हैदराबाद, नांदेड - बिदर राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी
पाच किलो मिटर पर्यंत वाहनाच्या रांगा.
नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा तापमानाचा कहर
तापमानाचा पारा पोहचला 44 अंश सेल्सिअस वर
या वर्षातील आज सर्वाधिक तापमानाची करण्यात आली नोंद
कधी अवकाळी पाऊस तर कधी तापमानाचा कहर
लग्नातील डीजे बंद केल्याच्या वादातून छत्रपती संभाजीनगर शहरातील औरंगपुरा तुफान राडा
गाण्याच्या फर्माईश वरून जोरदार हाणामारी
भाईंदर पूर्वेच्या नवघर रोड परिसरातील क्लासिक स्टील इंडस्ट्रीमध्ये आज सकाळी एका 58 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. मृत व्यक्तीचे अर्धे शरीर खिडकीच्या आत तर अर्धे शरीर खिडकीच्या बाहेर असल्याचे आढळून आल्याने ही घटना हत्या आहे की अपघात, याबाबत विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. संबंधित व्यक्तीचा मोबाईल खिडकीबाहेर पडला होता. तो काढण्याचा प्रयत्न करत असताना त्याची मान खिडकीच्या ग्रीलमध्ये अडकल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून हा अपघाती मृत्यू आहे की त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा विधान परीषदेचे आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत अमरावती विभागातील प्रहारचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आणि संपर्कप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्ष, संपर्कप्रमुख, तालुकास्तरीय पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी राजकीय आणि सामाजिक वाटचालीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी आणी प्रहार संघटनेच्या सामाजिक कार्याचा विस्तार आणि शिवसेना संघटना मजबूत करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. ज्या लोकांना राजकीय क्षेत्रामध्ये काम करायचे ते शिवसेना पक्ष प्रवेश करणार ज्यांना सामाजिक काम करायचे ते प्रहार मध्ये काम करणार असं ठरलं आहे.
कुडाळ तालुक्यातील सरंबळ दुर्गवाड धनगरवाडी येथील एका घरावर व नारळाच्या झाडावर वीज कोसळून मोठे नुकसान झाल्याची घटना काल संध्याकाळी घडली. विजेचा लोळ त्यांच्या घरावर पडल्यामुळे पत्रे फुटले तर उत्पन्न देणाऱ्या नारळाचे झाड जळून खाक झाले काल वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह कुडाळ तालुक्यात पाऊस कोसळला होता. यावेळी सरंबळ येथील रामा बापू वरक या शेतकऱ्यांचे विज पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
पुण्यातील हडपसर परिसरात मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला संतप्त नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना समोर आली आहे. ही घटना काल रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान गांधी चौक परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एका मुलीची छेड काढल्याचा आरोप संबंधित तरुणावर करण्यात आला. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत आरोपीला पकडले आणि त्याला बेदम मारहाण केली. घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.
बुलढाणा जिल्ह्यातील धरणगाव नदीजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर जळगावकडून मलकापूरकडे येणाऱ्या HR 39 G8057 क्रमांकाच्या धावत्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात धुराचे लोट पसरले व वाहतुकीवर परिणाम झाला. माहिती मिळताच मलकापूर नगरपालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आणि ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
जसं एपस्टीनला मारलं, तसंच खरातला मारतील....नाना पटोलेंचा खळबळजनक दावा.
ड्रग्ज प्रकरणात राज्य सरकारचे ४ मंत्री सामील...पटोलेंचा थेट आरोप.....
त्या ४ मंत्र्यांची नावं देणार, तात्काळ हकालपट्टी करण्याची पटोलेंची मागणी.....
विधिमंडळात दिलेल्या माहितीचा पटोलेंनी केला पुनरुच्चार....सरकारवर ओढले ताशेरे.
नंदुरबार शहरवासीयांना पाणी कपातीच्या संकट आजपासून लागू होणार, आजपासून शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात यंदा पाऊस कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने नंदुरबार पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.नंदुरबार शहराला दररोज सुमारे पंचाहत्तर लाख लिटर पाण्याची आवश्यकता असते. मात्र शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात सध्या केवळ साठ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने येत्या काळात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे पालिकेकडून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला असून, आजपासून नागरिकांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. या निर्णयाला भाजपकडून विरोध करण्यात आला असला तरी पालिका प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम असून, नागरिकांनी पाणी जपून आणि आवश्यकतेनुसारच वापरावे, असे आवाहनही पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरातील एम.जे. कॉलेज परिसरात तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या तीन अवैध सायबर कॅफेंवर रामानंदनगर पोलिसांनी शनिवारी दुपारी छापा टाकला. या कारवाईत कॅफे मालक आणि चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. एम.जे. कॉलेज परिसरातील काही कॅफेंमध्ये अल्पवयीन तसेच तरुण मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी खासगी जागा (कॅबिन) उपलब्ध करून दिली जाते, अशी गुप्त माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिस पथकाने पोलिसांच्या दामिनी पथकासह संयुक्तपणे ही मोहीम राबवली.
तामिळनाडूच्या राजकारणात आता थलपती पर्वाची सुरुवात झाली आहे. मुख्यंमत्र्यांचा हा शपथविधी सोहळा ऐतिहासिक आहे.
वरुड येथील युवकाला चौघांकडून भर रस्त्यात लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण..
अमरावतीच्या मलकापूर शेंदूरजनाघाट परिसरातील घटना...
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल...
चौघांकडून बेदम मारहाण होत असल्याच व्हिडिओतून उघड.
दीपक अग्गासपुरे असं मारहाण झालेल्या युवकाच नाव, मारहाणीचा कारण अस्पष्ट
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील विजय चिंचपुरे या गुंडावर जालना जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यातही अनेक गुन्हे दाखल आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील एका खाजगी डॉक्टरला खंडणी मागितल्या प्रकरणी ही या गुंडावर गुन्हे दाखल आहेत आणि त्यानुसार तो बुलढाणा कारागृहात बंदी होता. मात्र कारागृहातून सुटताच या गुंडाची त्याच्या साथीदारांनी बुलढाणा शहरातून मिरवणूक काढत व त्याचा सत्कार करत दाखवून दिलं आहे की, बुलढाणात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. यामुळे पोलिसांना आव्हान देत या गुंडाचा ताफा जालना जिल्ह्यातील भोकरदनच्या दिशेने रवाना झाला... असे व्हिडिओ सध्या सोशल माध्यमातून व्हायरल होत आहेत. त्यामुळे बुलढाणा शहर आणि परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. समाज माध्यमात अनेक व्हिडिओ व्हायरल होत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला अभिनेत्री त्रिशाने उपस्थिती दर्शवली आहे. थोड्याचवेळात होणार शपथविधी
पुणे शहरातल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल
सर्व मुली अल्पवयीन असल्याची माहिती
यवतमाळ जिल्ह्यात पावसाळा अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला असून शेतकऱ्यांनी शेतातील मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे. वाढत्या उन्हामुळे शेतकरी सकाळच्या वेळेतच शेतीकाम करण्यास प्राधान्य देत आहेत. दुपारच्या कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेक शेतकरी पहाटेपासूनच शेतात मशागत करताना दिसत आहेत. तसेच शेत सुपीक राहावे आणि पारंपारिक शेतीपद्धती जपली जावी यासाठी काही ठिकाणी बैलजोडीच्या सहाय्यानेही मशागत केली जात आहे.
आखाती देशातील युद्धामुळे सेवा होती बंद
युद्धजन्य परिस्थितीमुळे पुण्याहून दुबईला जाणारी सेवा बंद करण्यात आली होती.
मात्र आता पुणे दुबई विमानसेवा पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे
प्रवासी विमानसेवेत सोबत दुबई कार्गो सेवेला सुद्धा सुरुवात करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्यात पिक विमा वरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.हायकोर्टातून शेतकऱ्यांना 227 कोटी वितरित करण्याचे आदेश देण्यात आले होते.मात्र त्यानंतर विमा कंपनी सुप्रीम कोर्टात गेली. यावेळी सरकारचे कंपनी धार्जिण भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे शेकडो कोटी अडकून पडल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला आहे.93 कोटी न्यायालयात जमा करावे असे आदेश कोर्टाने दिले आहेत.तर कोणताही आदेश नसताना 134 कोटी सरकारी वकीलाच्या म्हणण्यावर जिल्हाधिकारी यांनी अडकून ठेवल्याचा आरोप कैलास पाटील यांनी केला. त्यामुळे सरकार कोणाच आहे शेतकऱ्यांच की कंपनीच असा संतप्त सवाल पाटील यांनी केला. 2020 च्या पिक विमा बाबत आता संभ्रमाचे वातावरण तयार आहे.
खामगाव येथील अकोला बायपासवर धावत्या कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. खामगावचे रहिवासी गोपाल गावंडे हे मेहकरकडे लग्नासाठी जात असताना कारच्या बोनेटमधून धूर निघत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून बाहेर पडताच काही क्षणांत कारने पेट घेतला. आगीने संपूर्ण कार भस्मसात झाली असून चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील तिंत्रज येथील कांदा उत्पादक शेतकरी भगवान साबळे यांनी अडीच एकरावरील 600 गोण्या कांद्याची काढणी केली होती
मात्र एक रुपया किलोचा भाव मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्याने 600 गोण्या कांदा पेटवून दिलाय
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.