NEET Maharashtra connection 
देश विदेश

NEET घोटाळ्याचे महाराष्ट्र कनेक्शन? लातूरमधून दोघे ताब्यात, एटीएस पथकाचं छापासत्र

NEET नीट परीक्षेचा पेपर लीक प्रकरणात मोठी घडामोड होताना दिसत आहे. याप्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश दिलेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालकांचीही उचलबांगडी करण्यात आलीय. आता या पेपर लीक प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे.

Girish Nikam

NEET परीक्षा घोटाळ्याचा तपास आता सीबीआय करणार आहे.या घोटाळ्याचं बिहार कनेक्शन समोर आलं असतानाच महाराष्ट्रातही त्याचे धागेदोरे सापडत आहेत. लातूरमध्ये एटीएसच्या पथकानं छापा टाकून चौकशी केली. पाहूया यावरचा एक खास रिपोर्ट.लोकसभा निवडणुकीचा धुरळा शांत होत नाही तोच देशभरात नीटवरुन रान उठवण्यात आलंय. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या परीक्षेत म्हणजेच नीटमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. विरोधकही आक्रमक झालेत.

या घोटाळ्याची आता सीबीआय चौकशी होणार आहे. ही परीक्षा घेणा-या NAT म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालकांचीही उचलबांगडी करण्यात आली आहे. घोटाळ्याचं बिहार कनेक्शन समोर आलं असतानाच धक्कादायक बाब म्हणजे नीट पेपरफुटीचे धागेदोरे आता खासगी कोचिंग क्लासेसची फॅक्टरी बनलेल्या लातूरपर्यंत पोहोचले आहेत.

नांदेडच्या एटीएस पथकाने लातूरमध्ये दोन ठिकाणी छापे टाकले. जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना ताब्य़ात घेतले आहे. पेपरफुटी प्रकरणात या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे. कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील हे दोघे शिक्षक 'पीएचडी'धारक आहेत. ते खासगी क्लासेस घ्यायचे अशी माहिती समोर आली आहे.

एटीएसनं ताब्यात घेतलेला शिक्षक जिथं राहत होता त्या ठिकाणी आपण जाऊया.

एकेकाळी दहावी-बारावी परीक्षेतील यशाचा लातूर पॅटर्न प्रसिद्ध होता. आता इतरही परीक्षांसाठी विद्यार्थी लातूरमध्ये येतात. लातूरमध्ये नीट, जेईईच्या तयारीसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेत असतात. लातूरमध्ये सुमारे 25 हजार विद्यार्थी नीटची परीक्षा देतात. त्यामध्ये 2 हजार विद्यार्थी पात्र ठरतात.

त्यामुळेच नीट गैरव्यवहारात लातूरचे काही धागेदोरे आहेत का या दृष्टीने तपास सुरू होता. दरम्यान बिहारमधून १३ आणि झारखंडमधून ६ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. कुठल्या राज्यात हा घोटाळ्याचं कनेक्शन आहे ते पाहूया.

बिहार

झारखंड

गुजरात

महाराष्ट्र

पंजाब

हरियाणा

देशभरातून सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी 5 मे 2024 रोजी नीट परीक्षा दिली होती. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स तर ठराविक सेंटरवरील विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्कस् दिल्याचं समोर आलं होतं. घोटाळ्याचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्यानं मात्र चिंता व्यक्त होतेय. नीटला लागलेली कीड मुळासकट नष्ट करुन भावी डॉक्टरांचं भविष्य सुरक्षित करण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Almond Jaggery Puran Poli Recipe : वाटीभर बदाम अन्...; गणपतीसाठी बनवा मऊ- लुसलुशीत पुरणपोळी

Maharashtra Live News Update: मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचायला सुरुवात

SCROLL FOR NEXT