CM Eknath Shinde On Modi Government Saam Tv
देश विदेश

CM Eknath Shinde On Modi Government: २०२४ ला सर्व रेकॅार्ड तुटतील, आम्हाला चिंता नाही; CM शिंदेंना ठाम विश्वास

Priya More

Delhi News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर एकीकडे विरोधकांची बंगळुरूमध्ये बैठक सुरु आहे. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये एनडीएची बैठक (NDA Meeting) होणार आहे. या बैठकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे देखील दिल्लीमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना '२०२४ ला सर्व रेकॅार्ड तुटतील, आम्हाला चिंता नाही.', असा विश्वास व्यक्त केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोदी सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे. त्यांनी सांगितले की, 'मोदीसाहेबांनी ९ वर्षांत केलेले काम बोलणारे आहे. काँग्रेसला जे कधी जमलं नाही ते मोदीजींनी ९ वर्षांत केले आहे. अनेक योजना राबवल्या आहेत. जगभरात मोदीजींचा सन्मान केला जात आहे. २०२४ ही मोदीजींची नव्हे तर भारताची निवडणूक आहे. २०२४ ला सर्व रेकॅार्ड तुटतील.'

'अजित पवार पक्षात आल्याने महाराष्ट्रात एनडीए मजबूत झाली आहे. डबल इंजिनचं सरकार आल्याने महाराष्ट्राची स्थिती बदललीय. क्लीन स्वीप आम्हाला मिळेल. ही स्वार्थासाठी केलेली युती आहे. आमच्या महायुतीसोबत 210 आमदार आहेत. त्यामुळं आम्हाला चिंता नाही.', असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी पुढे सांगितले की, 'एकीकडे विचारधारा असलेलं संघटन आहे. तर दुसरीकडे विरोधक नेता ठरवू शकत नाहीयेत. आत्मविश्वास गमावलेले विरोधक एकत्र आले आहेत. स्वार्थासाठी एकत्र आलेली ही लोकं आहेत. मोदीजींना बदनाम करण्यासाठी ते एकत्र आले आहेत.' तसंच, 'आपल्या देशाला बदनाम केलं जातंय ही कुठंली देशभक्ती?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. संपूर्ण जगामध्ये आज आपल्या देशाचं नाव आदराने घेतले जात आहे. त्यामुळे विरोधक जेवढे आरोप लावतील तेवढं एनडीए बळकट होईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, १० टक्के मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार?

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT