Mahadev Betting App Owner Ravi Uppal Arrested in Dubai Saam TV
देश विदेश

Mahadev Betting App: महादेव ॲपच्या मालकाला दुबईतून अटक, लवकरच भारतात आणणार; अनेक धक्कादायक खुलासे होणार?

Mahadev Betting App Owner Ravi Uppal Arrested : ईडीच्या आदेशानुसार इंटरपोलने रवीविरोधात रेड नोटीस जारी केली होती. त्या आधारे दुबई पोलिसांनी रवीला ताब्यात घेतले आहे.

प्रविण वाकचौरे

Update on Mahadev Betting App:

महादेव बुक ऑनलाईन बेटिंग प्रकरणी महादेव बुकचा मालक रवी उप्पलला दुबईतून अटक करण्यात आली आहे. उप्पल विरोधात बजावण्यात आलेल्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारावर दुबई पोलिसांनी ही अटक केली आहे. रवी उप्पलला लवकरच भारताच्या ताब्यात दिलं जाणार आहे.

६००० कोटी रुपयांच्या मनी लाँन्ड्रिंग प्रकरणी ईडी तपास करत आहे. छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर देखील या प्रकरणात आरोप झाले होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रवी उप्पल महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपच्या दोन मुख्य मालकांपैकी एक आहे. ईडीच्या आदेशानुसार इंटरपोलने रवीविरोधात रेड नोटीस जारी केली होती. त्या आधारे दुबई पोलिसांनी रवीला ताब्यात घेतले आहे.

रवी उप्पलचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) अधिकारी दुबईच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. ईडी व्यतिरिक्त छत्तीसगड पोलीस तसेच मुंबई पोलीस देखील उप्पलविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी करत आहेत. (Latest News Update)

कथित बेकायदेशीर सट्टेबाजीशी संबंधित या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ऑक्टोबरमध्ये छत्तीसगडच्या रायपूरमध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) गुन्हा नोंदवला होता. उप्पल आणि दुसरा मालक सौरभ चंद्राकर यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT