Sharad Pawar and Rahul Gandhi Saam Tv
देश विदेश

Lok Sabha Election 2024: लोकसभेसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? शरद पवार आणि राहुल गांधींच्या बैठकीत काय झाली चर्चा?

Maha Vikas Aghadi: नवी दिल्ली चार दिवसापूर्वी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये राज्याच्या परिस्थितीनुसार जागावाटप संदर्भात चर्चा झाली होती. आगामी काळात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीची जागावाटप त्या त्या राज्यातील पक्ष्यांच्या प्रमुखांनी बसून ठरवावं, असं बैठकीत ठरलं होतं.

साम टिव्ही ब्युरो

>> प्रमोद जगताप, दिल्ली

Lok Sabha Election 2024:

नवी दिल्ली चार दिवसापूर्वी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये राज्याच्या परिस्थितीनुसार जागावाटप संदर्भात चर्चा झाली होती. आगामी काळात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीची जागावाटप त्या त्या राज्यातील पक्ष्यांच्या प्रमुखांनी बसून ठरवावं, असं बैठकीत ठरलं होतं. त्या अनुषंगाने जागावाटप संदर्भात अनेक राज्यातील नेत्यांची बैठक सुरू झाली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणुका लढणार आहेत. त्याच निवडणुकांच्या अनुषंगाने आज राजधानी नवी दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या दिल्लीतील सहा जनपद या निवासस्थानी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शरद पवार यांची बैठक झाल्याची माहिती आहे.  (Latest Marathi News)

या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास वीस मिनिटे चर्चा झाली. राज्यातील महाविकास आघाडीचा जागावाटपाचे सूत्र कसं असावं या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी जागावाटप लवकरात लवकर पूर्ण होईल, असं सांगितलं होतं. त्याच अनुषंगाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जागावाटप जवळपास निश्चित असल्याचं बोललं जातंय.

सोबत काँग्रेस असल्याने जागा वाटपाचा तिढा दिल्लीतच सुटणार आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि शरद पवार या दोघांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत शरद पवार चर्चा करू शकतात. त्यानंतर जागा वाटपाचा अंतिम निर्णय राजधानी नवी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा हे तीन नेते बसून सोडवणार असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळते आहे. 31 डिसेंबर पूर्वी हे जागावाटप पूर्ण होण्याची देखील शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने आजच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

Weather Update: पुढील ३ दिवस पावसाचे; दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भात पाऊस पडणार, 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

Girls Shirt Style: जिन्सवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट शर्ट; ऑफिस किंवा कॉलेजमध्ये दिलास सगळ्यात ग्लॅमरस

Mumbai Tourism: मुंबईकरांसाठी खुशखबर! 'गंगा आरती'चा दिव्य अनुभव घ्यायचाय? तर 'या' २ ठिकाणांना नक्कीच भेट द्या

Dog Abuse Case : विकृतीचा कळस! तरुणाचा कुत्रीवर बलात्कार, आरोपीच्या तोंडाला काळं फासलं, चपलांचा हार घालून धिंड काढली

SCROLL FOR NEXT