Maha Kumbh 2025 Sadhvi Harsha Sadhvi Harsha Instagram
देश विदेश

Maha Kumbh 2025 : "..तर लग्न करता येत नाही" महाकुंभमेळ्यातील सुंदर साध्वीचं विधान चर्चेत

Maha Kumbh 2025 Sadhvi Harsha : महाकुंभमेळ्यात सहभागी झालेल्या साध्वी हर्षाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्नाविषयी केलेल्या विधानामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

Yash Shirke

Maha Kumbh 2025 : प्रयागराजच्या महाकुंभमेळ्याची जगभरात चर्चा होत आहे. कडाक्याच्या थंडीतही उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये खास महाकुंभमेळ्यासाठी करोडो भाविक जमले आहेत. या मेळ्यात सामील झालेल्या एका साध्वीची सर्वत्र चर्चा होत आहे. ही तरुण साध्वी आचार्य महामण्डलेश्वर स्वामी कैलाशनंदगिरी महाराज यांची शिष्या आहे असे म्हटले जात आहे. या साध्वीचे नाव हर्षा रिछारिया असल्याची माहिती समोर आली आहे.

हजारो भाविकांप्रमाणे साध्वी हर्षाने सुद्धा महाकुंभमेळ्यात सहभागी होऊन अमृतस्नान केले. तिला याबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, "मी अजूनही साध्वी बनले नाही आहे. संन्यास घेण्याबाबत माझा निर्णय झालेला नाही. गुरुंकडून दीड ते दोन वर्षांपूर्वी दीक्षा घेतली आहे. पण सध्या व्यावहारिक जीवनातून निवृत्ती घेऊन संन्यास घेण्याचा निर्णय मी घेतलेला नाही."

हर्षा रिछारिया ऊर्फ साध्वी हर्षा पुढे म्हणाली, "माझी संन्यास घेण्याची इच्छा नाही. संन्यास घेतल्यानंतर लग्न करता येत नाही. त्यामुळेच मी द्विधा मनस्थितीमध्ये आहे. संन्यास घेण्याबाबत माझा अंतिम निर्णय अजूनही झालेला नाही. मला सनातन धर्मांबद्दलची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. महाकुंभमेळ्यातील माझा पोशाख पाहून लोक माझे नाव साध्वी हर्षा असे ठेवले. मला सुंदर साध्वी असे म्हटले गेले. हे सर्व छान आहे. पण मला साध्वीचा टॅग देणं योग्य नाही."

हर्षा रिछारिया सध्या उत्तराखंडमध्ये वास्तव्याला आहे. तिचा जन्म झाशीत झाला होता. पण नंतर तिचे कुटुंब भोपालला शिफ्ट झाले. हर्षाने अनेक वर्ष मुंबई, दिल्ली अशा महानगरांमध्ये काम केले. ती मॉडेलिंग क्षेत्रात होती. त्याशिवाय तिने अँकरिंग, अ‍ॅक्टिंगही केली आहे. आवड निर्माण झाल्याने हर्षा अधात्माकडे वळली. दोन महिन्यांपूर्वी तिने बँकॉकमध्ये डेस्टिनेशन वेडिंग शो केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT