New Zealand Earthquake Saam TV
देश विदेश

New Zealand Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी न्यूझीलंडही हादरलं, ७.१ तीव्रतेचे धक्के, त्सुनामीचाही इशारा

New Zealand Earthquake News : न्यूझीलंडमध्ये बुधवारी (15 मार्च) 7.1 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले.

साम टिव्ही ब्युरो

New Zealand Earthquake News : न्यूझीलंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यूझीलंडमध्ये बुधवारी (15 मार्च) 7.1 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. अद्याप तरी या भूकंपाने जीवितहानीचे वृत्त आलेले नाही. चीनच्या भूकंप मापन केंद्राने या भूकंपाची वेळ चिनी प्रमाणवेळेनुसार 8.56 मिनिटे इतकी सांगितली आहे.  (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडच्या केरमाडेक बेटावर हा भूकंप आला आहे. स्थानिक सरकारच्या भूकंपीय मॉनिटर जियोनेटद्वारे मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाचे धक्के १० किमी खोल होते. जियोनेटने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचे धक्के संपूर्ण देशभरात जाणवले.

विशेष बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी तुर्की सीरियात झालेल्या भूकंपात हजारोंवर माणसे मृत्यूमुखी पडली आहेत. त्यानंतर अफगाणिस्तान आणि अन्य ठिकाणी देखील भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता 7.8 रिक्टर स्केल इतकी होती.

भूकंपाचं केंद्र तुर्कीच्या दक्षिण भागातील गाजियांटेप होतं. ही जागा सीरिया आणि तुर्कस्थानच्या सीमेवर आहे. त्यामुळे या दोन्ही देशात हाहाकार माजला. या भीषण भूकंपानंतर दोन्ही देशातील 50 हजार नागरिकांनी आपला जीव गमावला. तर 5 लाख 20 हजार घरांसह 1 लाख 60 हजार इमारतीही या भूकंपामुळे कोसळल्या होत्या.

दरम्यान, यापूर्वी देखील न्यूझीलंडमध्ये १५ फेब्रुवारी रोजी भूकंपाचे धक्के बसले होते. त्यावळी ६.१ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आला होती. EMSC ने दिलेल्या माहितीनुसार लोअर हटपासून ७८ किलोमीटर वायव्येला भूकंपाचे हादरे बसले होते. या भूकंपाचं केंद्र पारापारामूपासून ५० किलोमीटर वायव्येला आणि ७६ किलोमीटर खोल होतं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: दुकानात मिळणारे अ‍ॅलोव्हेरा जेल चेहऱ्यावर लावणे होतील 'हे' नुकसान; आजपासूनच घ्या काळजी

CBSE दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, दहावीची परीक्षा दोनदा होणार

Maharashtra Live News Update: कोरेगाव भीमामध्ये बसला आग, प्रवाशांंची धावाधाव

Accident News: भयंकर अपघात! दुचाकी समोरासमोर धडकल्या, पती-पत्नीसह तिघांचा जागीच मृत्यू

Earrings Designs: साडीपासून ते लेहेंग्यापर्यंत...; या कानातल्यांच्या डिझाईन्स आहेत कोणत्याही आऊटफिटसाठी परफेक्ट चॉइस

SCROLL FOR NEXT