ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पनीर भुर्जी ही झटपट, चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी आहे. नाश्ता, जेवण किंवा चपाती पावसोबत खाण्यासाठी बेस्ट पर्याय आहे.
पनीर, 1 बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो 1 बारीक चिरलेला, हिरवी मिरची , आले-लसूण पेस्ट , तेल किंवा बटर इ. साहित्य लागते.
हळद, लाल तिखट, धणे-जिरे पूड, गरम मसाला आणि मीठ चवीनुसार इत्यादी.
कढईत तेल किंवा बटर गरम करा. त्यात कांदा घालून मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. कांदा नीट परतल्याने भुर्जीला चव येते.
कांद्यावर आले-लसूण पेस्ट व हिरवी मिरची घाला आणि कच्चा वास जाईपर्यंत मिक्स करून परतून घ्या.
टोमॅटो घाला आणि तो मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. आता त्यात सगळे मसाले घालून तेल सुटेपर्यंत परतवून घ्या.यामुळे भुर्जीला छान रंग व चव येते.
बारीक केलेले पनीर तयार केलेल्या मिश्रणात घाला. मिश्रणाला ढवळा आणि 2 ते 3 मिनिटे शिजवा. जास्त शिजवू नका नाहीतर पनीर कडक होते.
गरम मसाला व थोडी कोथिंबीर घाला.गॅस बंद करून 1 मिनिट झाकण ठेवा म्हणजे चव नीट मुरते.
सोप्या पद्धतीने बनवलेली पनीर भुर्जी तयार आहे. ती तुम्ही चपाती, पराठा, पाव किंवा ब्रेडसोबत खाऊ शकता.चव वाढवण्यासाठी वरून थोडे बटर घालू शकता.