ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
खोबर, हिरवी मिरची आणि लसून वापरून बनवलेली ही चटणी अतिशय चवदार लागते. पोळी, भाजी किंवा भातासोबत छान लागते.
खोबरे , ३ ते ४हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या, मीठ चवीनुसार, पाणी आवश्यकतेनुसार इ. साहित्य लागते.
ताजे खोबरे किसून ठेवा किंवा बारिक तुकडे करा. ताज्या खोबऱ्यामुळे चटणीला छान सुगंध आणि गोडसर चव येते.
हिरव्या मिरच्या मधोमध कापून घ्या आणि मिरच्यांचे बारिक तुकडे करुन घ्या. ३ ते ५ मिरच्या घ्या. जास्त मिरच्या घेतल्यास चटणीचा तिखटपणा वाढतो.
४ ते ५ लसूणच्या पाकळ्या घ्या. पाकळ्या सोलून घ्या किंवा सोलून नाही घेतल्या तरी चालेल. जास्त लसूण घेवू नये.
मिक्सरमध्ये खोबरे, हिरवी मिरची, लसूण आणि मीठ घाला. मिक्सरमध्ये चांगले बारिक करुन घ्या. जर तुम्हाला सुकी चटणी हवी असेल तर सुकी ठेवा किंवा थोडे पाणी घालून पातळ करा.
हवे असल्यास वरून थोडे तेल,मोहरी आणि जिरे फोडणी घालू शकता. यामुळे चटणी अधिक चवदार लागते.
ही चटणी डोसा, चपाती आणि भाकरीसोबत सर्व्ह करु शकता. ही चटणी ताजी असतानाच खाल्ल्यास जास्त चविष्ट लागते.