Mafia Don Mukhtar Ansari Saam Digital
देश विदेश

Mafia Don Mukhtar Ansari : मुख्तार अन्सारीला तुरुंगात आला हार्ट अटॅक; तातडीने दाखल करण्यात आलं वैद्यकीय महाविद्यालयात

Mukhtar Ansari News : बांदा कारागृहात शिक्षा भोगत असलेला माफिया डॉन मुख्तार अन्सारीची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. मुख्तार अन्सारी यांना गुरुवारी रात्री अचानक हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना तुरुंगातून वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आलं.

Sandeep Gawade

Mafia Don Mukhtar Ansari

बांदा कारागृहात शिक्षा भोगत असलेला माफिया डॉन मुख्तार अन्सारीची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. मुख्तार अन्सारी यांना गुरुवारी रात्री अचानक हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना तुरुंगातून वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आलं. कारागृहातील तीन डॉक्टरांचे एक पॅनेल मुख्तार अन्सारीच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते, मात्र मुख्तारच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तातडीने पुन्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

२६ मार्चला दुपारी ३.५५ वाजता मुख्तार अन्सारीला बांदा तुरुंगातून वैद्यकीय महाविद्यालयात दाखलं करण्यात आलं होतं. सकाळपर्यंत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली तेव्हा माफिया डॉनची प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर आलं. त्यांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर दाखल करून उपचार सुरू करण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू मुख्तारचे समर्थक आणि कुटुंबीय बांदा गाठू लागले. मुख्तारचा भाऊ अफजल अन्सारी, मुलगा उमर अन्सारी बांदा येथे पोहोचले, मात्र कोणालाही मुख्तारला भेटू दिले नाही.

मेडिकल कॉलेज प्रशासनाने वेळोवेळी मुख्तार अन्सारीचे हेल्थ बुलेटिन जारी करून त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. 16 तास आयसीयूमध्ये ठेवल्यानंतर मुख्तारला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर मुख्तारची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. तीन डॉक्टरांचे एक पॅनल तयार करण्यात आले आहे, जे तुरुंगात मुख्तारच्या प्रकृतीवर नेहमी लक्ष ठेवून होतं. आता पुन्हा एकदा मुख्तार अन्सारी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi detained : राजधानी तापली! राहुल आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, काँग्रेस कार्यकर्त्यांची घरपकड

पूर्णेकरहत्येनंतर ठाण्यात आणखी एका शिवसेनेच्या दिवंगत नगरसेवकाच्या कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवत धमकी

Maharashtra News Live Update: दुष्काळाचे पंचनामे वेगाने सुरु आहेत- देवेंद्र फडणवीस

राहुल गांधी थेट बॅरिकेड्सवर चढले, तिरंगा फडकावला; 140 खासदारांचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा|VIDEO

Liver: गोड खाण्याची आवड लिव्हरवर पडतेय भारी, 'हे' संकेत वेळीच ओळखा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT