Viral Video Saamtv
देश विदेश

Viral Video: काळीज पिळवटणारं दृश्य! गावगुंडांनी पतीचे हातपाय तोडले, पत्नीने पाठीवर घेऊन पोलीस ठाणे गाठले; पाहा VIDEO

हा मन हेलावून टाकणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे.

Gangappa Pujari

Madhya Pradesh: सध्याचे युग हे इंटरनेटचे युग म्हणून ओळखले जाते. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. जे पाहून कधी आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो, तर कधी दुखःही होते. ,सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

ज्यामध्ये एक महिला आपल्या जखमी पतीला खांद्यावर घेवून जाताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओ मागची कथा ऐकून तुम्हीही भावूक व्हाल.. (Madhya Pradesh)

याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा मध्यप्रदेशमधील आहे. यामध्ये शेतीच्या वादातून गुंडांनी एका व्यक्तीचे हातपाय तोडल्याचा प्रकार घडला आहे. यानंतर जखमी पतीला घेऊन पत्नीने थेट पोलीस अधिक्षक कार्यालय गाठले असल्याची माहिती समोर आली आहे.

जखमी पतीला पाठीवर घेऊन जातानाचा पत्नीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उत्तरप्रदेशमधील या ह्रदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. महिलेच्या पाठीवर बसलेल्या तरुणाच्या एका पायाला आणि हाताला प्लास्टर दिसत आहे.

स्थानिक पोलिसांनी गुंडांवर किरकोळ कलम लावून गुन्हा दाखल केला असून कुणालाही अट केली नाही. तर पत्नीने त्याला SP कार्यालयात आणल्यानंतर चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, हा व्हिडिओ न्यूज २४ या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. त्याचबरोबर सदर आरोपींवर कडक कारवाईची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. (Viral Video)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रायगडमध्ये महायुती तुटली, सुनील तटकरेंचे स्पष्ट संकेत

Friendship songs: तुमच्या मित्रासाठी या फ्रेंडशिप डेला डेडिकेट करा ही हटके गाणी

Pandharpur News : पंढरपूरमध्ये बनावट खत कारखान्यावर कृषी विभागाचा छापा; ११ लाखांचा साठा जप्त

Moto G86 Power 5G: दमदार बॅटरी आणि कॅमेरासह हा फोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

महिला कॉन्स्टेबलला शिपाई नवऱ्यानंच संपवलं, शेतात नेत डोक्यात घातला रॉड; कारण..

SCROLL FOR NEXT