Dalit Youth Brutally Beaten for Opposing Illegal Mining Saam tv news
देश विदेश

सरपंचाच्या मुलाचा प्रताप! तरुणाला अमानुष मारहाण करत तोंडावर लघवी केली; आईलाही सोडलं नाही...

Dalit Youth Brutally Beaten for Opposing Illegal Mining: मध्य प्रदेशातील मतवारा गावातील तरूणावर अमानुष मारहाण. सरपंचाच्या मुलानं तरूणावर लघवी करून अमानुष वर्तन केलं. पीडित व्यक्तीच्या आईलाही मारलं.

Bhagyashree Kamble

  • मतवारा गावात दलित तरूणावर अमानुष हल्ला.

  • बेकायदेशीर खाणकामाला विरोध केल्यामुळे मारलं.

  • सरपंचाच्या मुलानं पीडित व्यक्तीवर लघुशंका केलं.

माणुसकीला काळीमा फासणारी घटना मध्य प्रदेशातील बाहोरीबंद पोलीस स्टेशन हद्दीतील मतवारा गावातून उघडकीस आली आहे. गावातील एका तरूणानं शेताजवळील बेकायदेशीर खाणकामाला विरोध केल्यामुळे त्याच्यावर अमानुष हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या आईने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिलाही ओढून मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे.

राजकुमार चौधरी असं पीडित व्यक्तीचे नाव आहे. त्या तरूणानं शेताजवळील बेकायदेशीर खाणकामाला विरोध केला होता. यामुळे संतप्त झालेल्या गावप्रमुख रामानुज पांडे, त्यांचा मुलगा पवन पांडे, पुतण्या सतीश पांडे आणि इतर गावकऱ्यांनी तरूणाला लोखंडी सळईने जबर मारहाण केली.

मुलावर हल्ला होत असल्याचं समजताच आईनं घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे केस ओढून मारहाण करण्यात आली. मारहाणीदरम्यान, सरपंचाचा मुलगा पवन पांडे यांनी पीडितेवर लघवी करण्यासारखे अमानुष कृत्य केले. तसेच जातीवाचक शिवीगाळ केली.

तक्रार केल्यास तरूणाला जीवे मारण्याचीही धमकी दिली. त्यामुळे पीडित तरूण पुन्हा गावी परतण्यास घाबरत आहे. याप्रकरणानंतर पीडित व्यक्तीनं पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. कटनीचे एसपी संतोष देहरिया यांनी सांगितले की, पीडित व्यक्तीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

SCROLL FOR NEXT