Crime : बहिणीवर झालेल्या बलात्काराचा बदला सामूहिक बलात्काराने!  SaamTvNews
देश विदेश

Crime : बहिणीवर झालेल्या बलात्काराचा बदला सामूहिक बलात्काराने!

मध्यप्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या बहिणीवर झालेल्या बलात्काराचा बदला घेण्यासाठी पीडितेच्या दोन भावांनी, आरोपीच्या बहिणीवर सामूहिक बलात्कार केला आहे.

वृत्तसंस्था

रिवा : मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) रिवा जिल्ह्यातल्या गढ पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या बहिणीवर झालेल्या बलात्काराचा (rape) बदला घेण्यासाठी पीडितेच्या दोन भावांनी, आरोपीच्या बहिणीवर सामूहिक बलात्कार (GangRape) केला आहे. (Madhya pradesh Rape for revenge)

या घटनेबाबत मुलीने स्वतः पोलीस ठाण्यात येऊन आरोपी तरुणांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (IPC) संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार आहेत. पोलीस पथक या प्रकरणाचा तपास करत असून वस्तुस्थितीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हे देखील पहा :

नेमकी कशी घडली घटना?

पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी (दि.१९ सप्टेंबर) मुलीचे आई-वडील मजुरीसाठी घराबाहेर गेले होते. ती घरी एकटी होती. यावेळी दोन्ही आरोपी भावांनी जबरदस्तीने मुलीच्या घरात प्रवेश केला आणि घराला आतून कुलूप लावले. यानंतर दोघांनी पीडितेवर बलात्कार केला आणि गुन्हा केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.

7 महिन्यांपूर्वी आरोपींच्या बहिणीवर झाला होता अत्याचार :

ज्या दोन भावांवर सामूहिक बलात्काराचा आरोप आहे, त्यांच्या बहिणीने 7 महिन्यांपूर्वी एका तरुणावर बलात्काराचा आरोप केला होता. सदर प्रकरणातील पीडितेचा तो सक्खा भाऊ आहे. मात्र, पोलिसांना भीती आहे की ही तक्रारही खोटी असू शकते, म्हणूनच या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.

या घटनेबाबत मुलीने स्वतः पोलीस ठाण्यात येऊन आरोपी तरुणांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार आहेत. पोलीस पथक या प्रकरणाचा तपास करत असून वस्तुस्थितीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मात्र, पीडित बहिणीवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी एका निष्पाप आणि निरागस जीवावर अत्याचार करण्याचा हा प्रकार निश्चितच धक्कादायक मानावा लागेल. आधीच देशभरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अन्यायग्रस्त पीडितांना न्याय मिळताना वेळ लागत आहे. मात्र, त्यांना न्याय देण्यासाठी एखाद्या निष्पाप महिलेवर अत्याचार होत असेल तर अत्यंत खेद मानवा लागेल.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT