Congress  Saam tv
देश विदेश

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; उमेदवाराचा अर्ज रद्द, भाजप नेत्याच्या विजयाचा मार्ग सोपा?

congress politics : राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला आहे.

Vishal Gangurde

काँग्रेसला बसला मोठा झटका

राज्यसभा उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा अर्ज रद्द

अर्ज रद्द झाल्याने भाजपचा विजयाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा

मध्य प्रदेशच्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा अर्ज छाननीत रद्द करण्यात आला आहे. यामुळे मध्य प्रदेशातील राज्यसभेच्या तिसऱ्या जागेची लढत संपल्यात जमा आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने भाजप उमेदवार महेश केवट यांची बिनविरोध निवड होणे निश्चित मानली जात आहे.

भाजपने काँग्रेस उमेदवाराच्या अर्जाच्या प्रतिज्ञापत्रात फौजदारी खटले लपवल्याचा आरोप केला. भाजप नेते कैलाश विजयवर्गीय आणि राकेश सिंह यांनी मिनाक्षी नटराजन यांच्या अर्जावर आक्षेप घेतला. निवडणूक अधिकाऱ्याने भाजपच्या आक्षेपावर मिनाक्षी नटराजन यांना बाजू मांडण्यासाठी मंगळवारी सांयकाळी ६ वाजेपर्यंत वेळ दिली होती. परंतु मिनाक्षी नटराजन यांच्या उत्तरावर निवडणूक अधिकारी समाधानी झाले आहेत, त्यानंतर त्यांचा अर्ज रद्द केला.

मिनाक्षी नटराजन यांच्यावर आरोप आहे की, अर्जाच्या प्रतिज्ञापत्रात हैदराबादातील कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणाचा उल्लेख केला नसल्याचा आरोप आहे. या आरोपावरून त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला. मध्य प्रदेशातील राज्यसभेच्या तीन जागांवर १८ जून रोजी निवडणूक होणार आहे. मध्य प्रदेशात २३० सदस्यांपैकी १६४ जागा आमदार भाजपकडे आहेत. या संख्येच्या आधारावर भाजप राज्यसभेच्या दोन जागा सहज जिंकू शकतात. तर दोन जागा जिंकल्यानंतर ४८ मते शिल्लक राहतात.

तिसऱ्या जागेसाठी क्रॉस व्होटिंग किंवा अन्य पक्षाच्या समर्थनाची गरज आहे. काँग्रेसजवळ ६३ आमदार आहेत. परंतु दोन आमदार (राजेंद्र भारती आणि मुकेश मल्होत्रा) राज्यसभेच्या मतदानासाठी पात्र नाहीत. त्यामुळे काँग्रेसकडे ६१ मते आहेत. मध्य प्रदेशातील राज्यसभेची तिसरी जागा महत्वाची मानली जात होती. याचदरम्यान मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील राज्यसभेची तिसरी जागा भाजपच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT